शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

विडी कामगारांसाठी युनिफॉर्म गारमेंटस्चा पर्याय, सोलापुरात प्रदर्शन : प्रशिक्षणास जागा देण्याची आयुक्तांची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 15:22 IST

घरघर लागलेल्या सोलापुरातील विडी उद्योगाला विशेषत: यामध्ये काम करणाºया सुमारे ६० हजार कामगारांसमोर आता  येथे नव्याने विकसित होत असलेल्या युनिफॉर्म (गणवेश) गारमेंट उद्योगातील रोजगाराचा पर्याय ठेवण्यात येणार असून, या कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र सुरू करण्यास जागा देण्याची तयारी महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दर्शविली आहे.

ठळक मुद्देविडी कामगारांसमोर युनिफॉर्म गारमेंटस् उद्योगात सहभागी होण्याचा मोठा पर्याय विडी कामगारांना आधार देण्यासाठी योजना गारमेंट उद्योग हा सोलापूरसाठी आशेचा किरणविडी कामगारांना पुरेसा रोजगार देणारी ही संकल्पना

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १६ : घरघर लागलेल्या सोलापुरातील विडी उद्योगाला विशेषत: यामध्ये काम करणाºया सुमारे ६० हजार कामगारांसमोर आता  येथे नव्याने विकसित होत असलेल्या युनिफॉर्म (गणवेश) गारमेंट उद्योगातील रोजगाराचा पर्याय ठेवण्यात येणार असून, या कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र सुरू करण्यास जागा देण्याची तयारी महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दर्शविली आहे.शहराच्या पूर्व भागातील हजारो कुटुंबांना विडी उद्योगाचा मोठा आधार मिळतो. महिला वर्ग या उद्योगात कामगार म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे; पण विड्यांची कमी होत असलेली मागणी आणि आरोग्यासंबंधीचा सावधानतेचा इशारा देणारे चिन्ह सुस्पष्ट आणि मोठ्या आकारात विडी बंडल्स्वर छापण्याचे सरकारने बंधनकारक केल्यामुळे या येथील विडी उद्योगाची मोठी पिछेहाट झाली आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन येथे वालजी युनिफॉर्मस्ने आयोजित केलेल्या एक दिवसाच्या कापड प्रदर्शनाच्या उद्घाटन सत्रात डॉ. ढाकणे यांनी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचे सूतोवाच करून त्यासाठी महापालिकेची जागा देण्याचीही इच्छा प्रकट केली.या समारंभास बालाजी अमाईन्सचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी, इंडियन मॉडेल स्कूलचे प्रा. ए. डी. जोशी, वालजी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक किशोर कोठारी, बिर्ला सॅलिलोजचे सहाय्यक सरव्यवस्थापक अंकुर थोरात, महावीर टेक्सस्टाईल्सचे प्रकाशचंद डाकलिया, नगरसेवक उपस्थित होते.राम रेड्डी यांनी यावेळी बोलताना विडी कामगारांसमोर युनिफॉर्म गारमेंटस् उद्योगात सहभागी होण्याचा मोठा पर्याय खुला असल्याचे सूतोवाच केले. युनिफॉर्म गारमेंट उद्योग हल्ली शहरासाठी मोठा कणा होऊ पाहात आहे, असे ते म्हणाले, हा धागा पकडून डॉ ढाकणे यांनी अडचणीत असलेल्या विडी कामगारांना आधार देण्यासाठी आपल्या योजना सांगितल्या. ते म्हणाले, गारमेंट उद्योग हा सोलापूरसाठी आशेचा किरण आहे. सोलापुरात मोठ्या संख्येने गणवेश तयार केले जातात. त्याचे देशभर वितरण होते. गणवेशाची शिलाई ही मशीन्सवर केली जाते. यासाठी फारसे कुशल कामगार लागत नाहीत. त्यामुळे विडी उद्योगातील महिला यातून रोजगार निर्मिती करू शकतात.  विडी कामगारांना पुरेसा रोजगार देणारी ही संकल्पना राबविण्यासाठी भावनिक आवाहन केले तर अनेकजण सहकार्यासाठी पुढे येतील, असा विश्वास डॉ. ढाकणे यांनी व्यक्त केला.यावेळी कोठारी, थोरात यांची भाषणे झाली. हे प्रदर्शन पाहण्यासाठी सोलापुरात गारमेंटस् उद्योगातील मान्यवर उपस्थित होते.------------------लवकरच बैठकसोलापुरात युनिफॉर्म गारमेंट उद्योगाला चालना देण्यासाठी आणि यामध्ये विडी कामगार महिलांना समाविष्ट करण्याच्या उद्देशाने लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल. शिवाय प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासंदर्भातही यामध्ये चर्चा करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी यावेळी सांगितले.-----------------प्रदर्शनात ७००० डिझाईन्सजुनपासून सुरू होणाºया गणवेशाच्या हंगामासाठी पूर्वनियोजन करणे सोयीचे व्हावे, यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन केले असून, वालजी युनिफॉमर्स, बिर्ला सॅलिलोजने हे प्रदर्शन येथील महावीर टेक्स्टाईलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले आहे. या प्रदर्शनात सोलापुरात उद्योजकांसाठी ७००० डिझाईन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती ‘महावीर’चे प्रकाशचंद डाकलिया यांनी दिली.

टॅग्स :Solapurसोलापूर