शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

उजनीचं पाणी... ...‘मामां’ची कहाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:22 IST

‘पंढरपूर’चं ‘बारामती’ करू, अशी स्वप्नं दाखविणाऱ्या ‘दादां’ची भाषणं अजूनही ताजी.. निवडणुकीचा निकालही अद्याप न लागलेला; तोपर्यंत ‘उजनी’चं ‘वाळवंट’ ...

‘पंढरपूर’चं ‘बारामती’ करू, अशी स्वप्नं दाखविणाऱ्या ‘दादां’ची भाषणं अजूनही ताजी.. निवडणुकीचा निकालही अद्याप न लागलेला; तोपर्यंत ‘उजनी’चं ‘वाळवंट’ बनविण्याचा कट पूर्वीच शिजल्याचा वास लागलेला. मुळात ‘उजनी’ धरण बांधलं पिण्याच्या पाण्यासाठी. दर उन्हाळ्यात मायनसमध्ये जाणारं हे धरण सोलापूरकरांसाठी जणू मृगजळच. या धरणापायी शेकडो गावं उद्‌ध्वस्त झाली, हजारो धरणग्रस्त बेघर झाले, निर्वासित बनले. एकीकडं महाराष्ट्रातलं सर्वात मोठ्ठं धरण म्हणवून शेखी मिरवायची, दुसरीकडं पाच दिवसांआड येणाऱ्या नळाच्या पाण्याला गुपचूप मोटार बसवायची. आता हे कमी पडलं की काय म्हणून याच धरणाचं पाच टीएमसी पाणी इंदापूरच्या शेतीला वळविण्याचा (की पळविण्याचा?) डाव साधला गेला.

ही कल्पना कुणाच्या ‘सुपीक’ डोक्यातून आली असावी, हे इथल्या स्थानिक ‘घड्याळ’वाल्यांना माहीतच असणार. मात्र, सत्तेची दोरी तोंडाला बांधलेली. कोण तोंड उघडणार अन्‌ रागीट ‘दादां’चा राग विनाकारण ओढवून घेणार ! असो, इंदापूरचे ‘मामा’ आपल्या भूमीला जागले. आता माढ्याचे ‘मामा’ मात्र भूमीला जागतात की, राजकीय निष्ठेला, याकडं साऱ्यांचं लक्ष. अजून एक आतली चर्चा. मंत्रिमंडळाच्या नव्या बदलात कदाचित त्या ‘मामां’चं पालकत्व जाणार... अन्‌ या ‘मामां’ना लालदिव्याची गाडी लाभणार.

...पण ‘मोहोळ’च्या ‘यशवंतरावां’ना ‘पालकत्व’ देण्याबाबत म्हणे ‘बळीरामकाका’ अन्‌ ‘अनगरकर’ आग्रही. मंत्रिपद मतदारसंघातच राहतं अन्‌ सुंठेवाचून ‘मामां’चा खोकलाही जातो, हा दोघांचा होरा. असं झालं तर जिल्ह्याच्या नशिबी पुन्हा इंदापूरचीच गाडी...लगाव बत्ती...

‘मामा इंदापूरकर’ गेल्या वर्षभरात ‘सोलापूरकरां’ना कधी आपले वाटलेच नाहीत. कुणाचाही कॉल न घेणं ही त्यांची जशी खासियत, तसेच सोलापूरचे कोणतेच प्रश्न गांभीर्याने न घेणं ही त्यांची स्टाइल. ‘आपण आता विरोधी पक्षात आहोत’ याची अजूनही जाणीव न झालेली ‘देशमुख’द्वय मंडळी ‘मामां’बद्दल कधी ‘ब्र’ शब्द काढताना न दिसलेली. मात्र, धनुष्यवाल्या ‘बरडें’पासून ‘हात’वाल्या ‘प्रकाशरावां’पर्यंत अनेक सहकाऱ्यांनीच या ‘मामां’विरोधात उठाव केलेला. आतातर हा ‘पालकमंत्री’च बदला, अशी मागणी ‘——’च्या ‘पाटलां’नी केलीय. का तर म्हणे, त्यांना माळशिरस तालुक्याच्या एकाही मिटिंगला बोलावले नाही. गेली पाच वर्षे ‘जिल्हाध्यक्ष’ असलेल्या या ‘पाटलां’ना मिटिंग म्हणजे काय, हेच माहीत नाही, हा भाग वेगळा... लगाव बत्ती...

भाऊ गल्लीबोळातच रमले...

बाहेरचा पालकमंत्री आणून जिल्ह्याचा कारभार हाकू पाहणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या साठमारीत जिल्हा पातळीवरील कणखर विरोधी नेतृत्वाची पोकळी निर्माण झालीय. नेहमी संधीची वाट पाहणारे बार्शीचे ‘राजाभाऊ’ मात्र अद्याप गल्लीबोळातल्या राजकारणातच अडकलेत. परजिल्ह्यातल्या रुग्णांना केवळ बार्शीच नव्हे, तर परराज्यातल्यांनाही अवघा जिल्हा बरा करतोय, ही भूमिका घेऊन ते पुढं सरसावले असते तर कदाचित बाकीच्या तालुक्यांमधूनही त्यांना उत्स्फूर्त सपोर्ट मिळाला असता. ‘फेसबुक’वरनं कौतुकाचं ‘लाइव्ह-बिइव्ह’ही नेहमीप्रमाणं झालं असतं.

असो. या ‘राजाभाऊं’ना परवा रात्री अकरा वाजता ‘वर्षा’ बंगल्यावरून थेट फोन आला, ‘काय राजाऽऽ काय चाललंय ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?’ विचारत ‘सीएम’नी बराच वेळ चर्चाही केली. किती गंमत नां... एकीकडं ‘देवेंद्र नागपूरकरां’वर निष्ठा ठेवलेल्या ‘राजाभाऊं’ना आजही ‘उद्धो ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?’ मोठ्या हक्कानं एकेरी हाक मारतात, दुसरीकडं याच ‘उद्धों’चं ‘धनुष्य’ घेऊन लढलेले ‘दिलीपराव’ पंढरपुरात ‘अजितदादां’च्या मांडीला मांडी लावून स्टेजवर बसतात. बार्शीचं राजकारणच लय येगळं राऽऽव.

पंढरपूरच्या स्टेजवरनं आठवलं. मंगळवेढ्याच्या भाषणात ‘दिलीपरावां’नी वाघाची गोष्ट सांगितली. वाघाची शिकार करायला चांगली बैठक असावी लागते, असं त्यांनी गालातल्या गालात हसत सांगितलं. हे ऐकून समोरची मंडळी गोंधळली. बार्शीच्या नेत्याची भाषा कदाचित पहिल्यांदाच त्यांच्या कानी पडली असावी. संतांच्या नगरीतल्या एकानं दुसऱ्याला कानात विचारलं, ‘ही बैठक कशी असते गड्याऽऽ’ दुसराही गडबडला. त्यानं थेट बार्शीतल्या पाव्हण्याला कॉल केला. तेव्हा लगेच विषय बदलत तो हुश्शऽऽर पाहुणा एवढंच बोलला, ‘नेत्यांच्या भाषेत बैठक म्हणजे शिकारीसाठी दबा धरून बसणं. यंदाच्या नगरपालिका इलेक्शनमध्ये दिसेल बघा तुम्हाला ही बैठक.’ फोन खडाऽऽक. लगाव बत्ती...