शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

उजनी पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण,३६ तासांनंतर पहिला पंप सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 17:56 IST

उजनी पाईपलाईनची गळती थांबविण्यासाठी अमृत योजनेतून हाती घेण्यात आलेल्या दुरुस्तीचे काम ३६ तासांनंतर पूर्ण झाले असून, सायंकाळी ५ वाजता पहिला पंप सुरू करण्यात आला. 

ठळक मुद्दे२५ व्हाल्व्ह बदलण्याचे काम एकाच वेळीसोमवारपासून पाणीपुरवठा सुरळीतअमृत योजनेतून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २७ : उजनी पाईपलाईनची गळती थांबविण्यासाठी अमृत योजनेतून हाती घेण्यात आलेल्या दुरुस्तीचे काम ३६ तासांनंतर पूर्ण झाले असून, सायंकाळी ५ वाजता पहिला पंप सुरू करण्यात आला. उजनी पाईपलाईनला गळती असल्याने अमृत योजनेतून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. बुधवारी पहाटे ५ वाजता उजनी येथील उपसा बंद करण्यात आला होता. सकाळी ८ च्या सुमारास विविध ठिकाणी २५ व्हाल्व्ह बदलण्याचे काम एकाच वेळी करण्यास सुरुवात केली. वास्तविक पाहता हे काम अवघ्या ३० तासात संपवण्याचे लक्ष्य होते. मात्र काम वाढल्याने ४८ तासांचा अवधी महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला होता. दुरुस्ती करणाºया कंपनीच्या कर्मचाºयांनी व महापालिकेच्या कर्मचारी अधिकाºयांनी हे काम ३६ तासात पूर्ण केले. गुरुवारी सायंकाळी पहिला पंप सुरू करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक अर्ध्या तासाच्या अंतराने चारही पंप सुरू करण्यात आले. रात्री ८ वाजता सर्व पंप सुरू झाले. रात्री ९.३० वाजता पाकणी येथील पंपाला पाणी पोहोचले, रात्री १० नंतर पाकणी येथील पंप सुरू करण्यात आला. त्यानंतर हे पाणी शहराला पोहोचले. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुरू आहे. ------------------------सोमवारपासून पाणीपुरवठा सुरळीतदुरुस्तीसाठी शटडाऊन घेण्यात आल्याने बुधवारपासून सर्व शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे गेला आहे. शहराला तीन दिवसा आड पाणीपुरवठा होतो. शुक्रवारपासून हा पाणीपुरवठा होणार आहे. सोमवारपर्यंत हा पाणीपुरवठा सुरळीत होईल.