शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

उजनी धरण, तलाव कोरडेच

By admin | Updated: July 18, 2014 01:29 IST

पावसाळ्यात पाणीसाठा घटतोय : समस्या होणार कठीण

सोलापूर: भरवशाच्या चार नक्षत्रांचा म्हणावा तसा पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील पाणीसाठे धोक्यात आले आहेत. उजनी धरणाचा पाणीसाठा दररोज घटत असून, मध्यम व लघू प्रकल्पांतील पाण्याचीही वाढ होत नाही. मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यातील अनेक तलाव कोरडेच आहेत.सोलापूर जिल्ह्यात मागील वर्षी जूनपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली होती. जरी मोठा पाऊस झाला नसला तरी किमान जमिनीतील पाणीपातळी वाढण्यायोग्य पाऊस पडत होता. पावसाळ्याच्या शेवटी-शेवटी सप्टेंबरमध्ये काही भागात मोठा पाऊस झाल्याने तलावातील पाणी साठ्यात वाढ झाली होती. पुणे व सोलापूर जिल्ह्यात चांगला पाऊस पडत राहिल्याने उजनी धरणात पाणी साठ्यात दररोज भर पडत होती. यंदा याउलट चित्र आहे. उजनी धरणाचा पाणीसाठा दररोज अंशत: कमी होत आहे. असेच चित्र मध्यम व लघू प्रकल्पांचे आहे. जिल्ह्यातील ८ पैकी एकरुख, मांगी, बुद्धेहाळ हे मध्यम प्रकल्प कोरडे असून, आष्टी तलावात २६ टक्के, हिंगणी तलावात १३ टक्के, पिंपळगाव ढाळेत १६ टक्के तर जवळगाव तलावात ६ टक्के पाणीसाठा आहे. ------------------------४८ तलाव कोरडे ठणठणीतजिल्ह्यातील ५३ पैकी पाच लघू प्रकल्पांत सध्या पाणीसाठा आहे. उर्वरित सर्वच ४८ तलाव कोरडे आहेत. होटगी तलावात २४.३७ टक्के, बीबीदारफळ तलावात १९.४२ टक्के, पाथरी तलावात ६८.५१ टक्के, कोरगाव तलावात २.४७ टक्के तर चारे तलावात ६.३६ टक्के पाणीसाठा आहे. अक्कलकोट, करमाळा, माढा, सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील सर्वच तलाव कोरडे ठणठणीत आहेत. ---------------------------मागील वर्षी ८ जून रोजी वजा ५० टक्क्यांवर गेलेली उजनी धरणाची पाणीपातळी १५ जुलै रोजी वजा १५.४९ टक्क्यांवर आली होती. पुणे जिल्ह्यातून पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने कॅनॉल व नदीद्वारे सहा हजार ७०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले होते़यंदा पावसाळा सुरु झाल्यानंतर दररोज उजनीचा पाणीसाठा कमी होत आहे. मंगळवारी वजा २६.५३ टक्के पाणीपातळी होती़दौंडवरुन ७४१० क्युसेक्स तर बंडगार्डनवरुन ८४३६ क्युसेक्सचा विसर्ग उजनीत सुरू होता. यंदा आजअखेर उजनी धरणाच्या पाणी साठ्यात किंचितही वाढ झालेली नाही़