शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात वर्षभरात दोन हजार दुचाकी होतात स्क्रॅप; रिम, टायर, कार्बोरेटरला मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 14:30 IST

दुचाकी स्क्रॅपमध्ये प्लास्टिक, अल्युमिनियम, लोखंड, स्टील आणि तांबा मिळते. प्रत्येक गाडीत ते वेगवेगळे प्रमाण असते.

सोलापूर : शहरात दुचाकी स्क्रॅप करणारे पंचवीसपेक्षा अधिक व्यावसायिक असून, वर्षभरात त्यांच्याकडे दोन हजार दुचाकी स्क्रॅपसाठी येतात, असे स्क्रॅप व्यावसायिकांनी सांगितले. स्क्रॅपमध्ये आलेल्या दुचाकीमधून निघणारे कार्बोरेटर, रिम, टायर, बॅटरी, ट्यूब, क्लच हब, इंजिन चेंबर अशा सुट्या भागांना बाजारात खूप मागणी आहे. तर स्क्रॅप केल्यानंतर लोखंड आणि अल्युमिनियम पुणे, मुंबई, कोलकत्ता, चेन्नई आणि बेंगलोर येथे विक्रीसाठी पाठवली जातात.

दुचाकी स्क्रॅप करण्यासाठी अथवा वाहनाची विल्हेवाट लावण्यापूर्वी नागरिकांना करांची थकबाकी भरून ‘आरटीओ’कडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यासाठी शुल्क आकारले जाते. मात्र, नागरिक ‘ना हरकत’ न घेताच जुन्या गाड्यांना मॉडीफाइड करून वापरण्यावर भर देताना दिसतात.

एक दुचाकी स्क्रॅपसाठी तीन तास लागतात. गाडी स्क्रॅप करण्यापूर्वी वाहनधारकांकडून वाहन नोंदणीप्रमाणपत्र, आधार कार्ड, प्रतिज्ञापत्र, गाडीचा आणि त्यांचा फोटो घेऊन गाडी स्क्रॅप केली जाते.

काय मिळते स्क्रॅपमध्ये

  • दुचाकी स्क्रॅपमध्ये प्लास्टिक, अल्युमिनियम, लोखंड, स्टील आणि तांबा मिळते. प्रत्येक गाडीत ते वेगवेगळे प्रमाण असते.
  • मोटारसायकल - प्लास्टिक ३ किलो, अल्युमिनियम ४ ते ५ किलो, लोखंड ५० ते ६० किलो.
  • मोपेड - प्लास्टिक ५ ते ६ किलो, अल्युमिनियम ६ ते ७ किलो, लोखंड ३५ ते ४० किलो.
  • १०० सीसी मोपेड- प्लास्टिक २ ते ३ किलो, अल्युमिनियम ८ ते ९ किलो, लोखंड ४० ते ५० किलो.

 

असा आहे दर

  • स्कूटी : १००० ते २०००
  • ॲक्टिव्हा : ३००० ते ५०००
  • मोटारसायकल ३००० ते ६०००

 

स्क्रॅप वाहनांतील सुटे भाग वापरण्यास उपयुक्त ठरू शकतात, अशा सुट्या भागांची विक्री अगदी कमी किमतीत केली जाते. राहिलेला स्क्रॅप व्यावसायिकांना दिला जातो. आम्हाला एका गाडीमागे जेमतेम दोन हजारांचा फायदा होतो.

- खालीद सालार, स्क्रॅप व्यावसायिक

--

टॅग्स :SolapurसोलापूरRto officeआरटीओ ऑफीस