शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील दोन पोलीस निलंबित, तिघांची बदली मुख्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 13:20 IST

मंगळवेढा कारागृहातील कै दी पलायन प्रकरण; १५ दिवसांत मंगळवेढ्यातील चार पोलीस निलंबित

ठळक मुद्देकैदी पलायनप्रकरणी दोघांना निलंबित, तिघांना पोलीस मुख्यालयात बदलीचे आदेश निष्काळजीपणामुळे १५ दिवसात चौघांना निलंबित व्हावे लागले

मंगळवेढा : मंगळवेढा येथील सबजेलमधून तीन कोरोना पॉझिटिव्ह आरोपींनी पलायन केले होते. यावेळी कारागृहात ड्यूटीवर असलेल्या पोलीस कर्मचाºयांनी कर्तव्यात कसूर केली म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नागनाथ डबरे, नामदेव कोळी या दोन पोलीस कर्मचाºयांना निलंबित केले तर अजित सुरवसे, अजित मिसाळ, अनिल दाते या तीन पोलीस कर्मचाºयांची पोलीस मुख्यालयात बदली केली आहे. 

मंगळवेढा उपकारागृहातून २० जुलै रोजी पहाटे ४ वाजता खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील व कोरोना पॉझिटिव्ह असणाºया तीन कैद्यांनी सबजेलमधून धूम ठोकली होती. दोघांना जेल परिसरात पकडले तर तिसºयास टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथे पोलिसांनी अटक केली होती. 

कारागृहात ड्यूटीवरील पोलीस कर्मचाºयांची चौकशीसाठी तपासी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे व चौकशी अधिकारी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांची नेमणूक केली होती. त्यांच्या अहवालानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्या दोन पोलीस कर्मचाºयांना निलंबित केले आहे. 

१५ दिवसांत चार पोलीस निलंबितमंगळवेढा सबजेल मधील कोरोना पॉझिटिव्ह कैदीस बेकायदेशीरपणे त्याच्या घरी नेऊन पार्टी करणाºया  पोलीस कर्मचारी बजरंग माने, उदय ढोणे या दोघांना  यापूर्वीच निलंबित केले आहे. त्यानंतर तीन कोरोना पॉझिटिव्ह व गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कैदी पलायन प्रकरणी नागनाथ डबरे, नामदेव कोळी या दोघांना निलंबित केले. त्या दिवशी सबजेलला ड्यूटीवरील अन्य अजित सुरवसे, अजित मिसाळ, अनिल दाते तिघांना  पोलिस मुख्यालयात बदलीची कारवाई झाली आहे. निष्काळजीपणामुळे १५ दिवसात चौघांना निलंबित व्हावे लागले.

कैदी पलायनप्रकरणी दोघांना निलंबित, तिघांना पोलीस मुख्यालयात बदलीचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. कर्तव्यात कसूर करणाºया कोणचीही गय केली जाणार नाही.     - अतुल झेंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसTransferबदली