शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरात अवैध गॅस भरणा केंद्रावर दोन ठिकाणी धाडी,  १ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 16:11 IST

सोलापूर दि २९ : सोलापूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या मुळेगांव व कोंडी येथील अवैध गॅस भरणा केंद्रावर अचानक धाड टाकून १ लाख ३५ हजार ८२० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला़ ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीसांनी केली़ 

ठळक मुद्देमुळेगाव, कोंडी हद्दीत झाली कारवाईसोलापूर तालुका पोलीसांची कारवाईअवैध धंद्याविरोधात पोलीसांची धडक मोहिम सुरूच

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २९ : सोलापूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या मुळेगांव व कोंडी येथील अवैध गॅस भरणा केंद्रावर अचानक धाड टाकून १ लाख ३५ हजार ८२० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला़ ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीसांनी केली़ दरम्यान, कोंडी व मुळेगाव परिसरात गुप्त पध्दतीने अवैध गॅस वाहनात भरला जातो अशी माहिती पोलीसांना मिळाली होती़ त्यानुसार पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, नायब तहसिलदार राजेश शेटे व विजय कवडे याच्या पथकाने कोंडी व मुळेगाव येथील अवैध गॅस भरणा केंद्रावर धाड टाकली़ या धाडीत भारत गॅस कंपनीचे चार सीलबंद टाक्या, दोन रिकाम्या टाक्या, इंण्डेन गॅस कंपनीची एक टाकी, आयकॉन कंपनीचा इलेक्ट्रीक काटा असा एकूण १५ हजार रूपये किंमतीचा राहुटी कोंडी या ठिकाणचा मुद्देमाल जप्त केला़ तर दुसºया कारवाईत मुळेगांव (ता़ द़ सोलापूर) येथील इंण्डेन कंपनीची गॅस टाकी, इलेक्ट्रीक काटा, सेल्को कंपनीचा इलेक्ट्रीक काटा, तीन चाकी अ‍ॅटो रिक्षा असा एकूण १ लाख २० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला़ याप्रकरणी नागेश बाबु साखरे (वय २४), निखिल मोहन सावंत (वय २७ रा़ धवल नगर, दामले वस्ती, मुळेगांव), जावेद नजीर बागवान (वय ३५) या तिघांना अटक करून त्यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सदरची कारवाई पोलीस अधिक्षक एस़ विरेश प्रभू, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, पोसई खतीब, टिंगरे, पोना माळी, पोकॉ गायकवाड, शेख, शेळके यांनी केली़