जामगाव, कुसळंब, वानेवाडी, अरणगाव, खामगाव परिसरात सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट सुरू झाला. त्यात पावसानेही हजेरी लावली. यावेळी जामगाव येथील हरिदास रामलिंग खांडेकर यांच्या बायपास शेजारी शेतातील बाभळीच्या झाडाला बांधलेल्या बैलजोडीच्या अंगावर वीज पडून ती जागीच ठार झाली. यामध्ये त्यांचे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती सरपंच बाबासाहेब जगताप यांनी तहसीलदारांना कळविली. त्यानंतर मंडल अधिकारी नलवडे व किशोर राठोड तलाठी यांनी वरिष्ठांना कळवून या घटनेचा पंचनामा केला. यावेळी बाळासाहेब जाधव, बाळासाहेब आवटे, रोहित आवट यांच्या आंब्याचे, कडब्याचे नुकसान झाले. बैलजोडी दगावल्याने मोठे नुकसान झाले असून त्याची भरपाई मिळावी अशी मागणी हरिदास खांडेकर यांनी केली.
जामगावमध्ये वीज पडून दोन बैल दगावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:21 IST