शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

साडेतीन वर्षांच्या मुलाला दोनशे देशांच्या राजधान्या तोंडपाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 11:00 IST

बालदिन विशेष...

ठळक मुद्देतनवीरला डिसेंबर २०१८ मध्ये वंडर बुक आॅफ रेकॉर्ड्स इंटरनॅशनल अमेझिंग वंडर किड म्हणून किताब मिळालामार्च २०१९ मध्ये जीनियस बुक आॅफ रेकॉर्डमध्ये मेस्मेरायजिंग मेमरी किड हा किताब त्याने मिळवलातनवीरला जगातील १२० प्रमुख पुस्तकांच्या लेखकांची नावे तोंडपाठ

रुपेश हेळवे 

सोलापूर : कोणालाही विश्वास बसणार नाही, अशी ही घटना. फक्त साडेतीन वर्षांच्या मुलाचे चार भाषांवर प्रभुत्व आहे. याबरोबर दोनशे देशांच्या राजध्यान्यांची नावे, जागतिक कीर्तीच्या १२० लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांची नावे त्याला तोंडपाठ आहेत़ एवढेच नाही तर त्याच्या या तल्लख बुद्धीमुळे तीन जागतिक रेकॉर्ड त्याच्या नावावर झाले आहेत़ अशा विलक्षण, असामान्य बुद्धिमत्ता असलेल्या मुलाचे नाव आहे तनवीर नलिनीकांत पात्रो.

तनवीरचा जन्म १ आॅक्टोबर २०१५ मध्ये झाला़ त्याचे वडील नलिनीकांत पात्रो हे ओडिशाचे आहेत़ ते सध्या तनवीरला मार्गदर्शन करतात़ त्याची आई सरिता उराडे पात्रो या औषध निर्माण अधिकारी असून, त्या जिल्हा क्षयरोग केंद्र सोलापूर येथे कार्यरत आहेत़ तो जवळपास दीड वर्षाचा असतानापासून त्याला विविध खेळ, पुस्तक यामधून विविध माहिती आई-वडिलांनी दिली़ तनवीरने लहान वयातच इंग्रजी, मराठी, ओडिया, हिंदी या भाषांवर प्रभुत्व मिळवले आहे.

तनवीरला डिसेंबर २०१८ मध्ये वंडर बुक आॅफ रेकॉर्ड्स इंटरनॅशनल अमेझिंग वंडर किड म्हणून किताब मिळाला. या वर्षी इन्क्रे डिबल बुक आॅफ रेकॉर्डमध्ये त्याने जागतिक विक्रम केले़ तर मार्च २०१९ मध्ये जीनियस बुक आॅफ रेकॉर्डमध्ये मेस्मेरायजिंग मेमरी किड हा किताब त्याने मिळवला. त्याच्या या पराक्रमामुळे अनेक पुरस्कार त्याला मिळाले आहेत.

यामुळेच सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारूड व सोलापूरचे खासदार डॉ़ जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते तनवीरचा सत्कार करण्यात आला आहे.

...इतकी माहिती त्याला तोंडपाठ तनवीरला जगातील १२० प्रमुख पुस्तकांच्या लेखकांची नावे तोंडपाठ आहेत. जगातील दोनशे पन्नास शास्त्रज्ञांची नावे आणि त्यांनी लावलेले शोध यांची माहिती आहे़ सुमारे दोनशे पाच देशांच्या राजधान्या त्याला तोंडपाठ आहेत़ भारताच्या २८ राज्य तसेच ९ केंद्रशासित प्रदेशांच्या राजधान्याही त्याला माहिती आहेत़ सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची नावे तो सांगू शकतो़ जगातील ७५ देशांचे ध्वज तो पाहून सांगू शकतो़ भगवतगीतेच्या अठरा अध्यायांची नावेही त्याला पाठ आहेत.

घरात टीव्ही बंदच तनवीर हा एक वर्षाचा असल्यापासून त्याला आम्ही शिक्षण देत आहोत़ त्याला शिकवण्यासाठी घरातील टीव्ही आम्ही बंद ठेवला आहे़ त्याला जी काही माहिती द्यायची आहे ती आम्ही मोबाईलद्वारे देत आहोत़ तो नेहमी मोबाईलवर नासाचे विविध व्हिडीओ पाहत असतो़ तो अजून शाळेला जात नाही़ पण त्याला चित्रे जास्त असलेली पुस्तके बघायला आवडतात़ त्याला यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची इच्छा आहे़ - सरिता नलिनीकांत पात्रो, तनवीरची आई

टॅग्स :Solapurसोलापूरchildren's dayबालदिन