शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

ट्वेंटी ट्वेंटी वर्षाचा संकल्प..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 13:21 IST

एकंदरीत नवीन वर्षासाठी करायच्या ‘संकल्पा’विषयीचे उत्साहवर्धक आणि प्रोत्साहनपर वातावरण अनुकरणीय आहे.

नवीन  ट्वेंटी ट्वेंटी वर्ष सुरु झाले. आॅस्ट्रेलियामधील नागरिकांकडून होणारे नववर्षाचे स्वागत पाहण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. एकंदरीत संकल्पनेतून हे वर्ष ‘व्हायब्रंट’ असल्याची जाणीव झाली. आपल्याकडे नववर्षाचा ‘संकल्प’ करण्याची पद्धत आहे तशी इकडे ‘न्यू इयर रिझोल्यूशन’ची पद्धत आहे. विशेष म्हणजे रिझोल्यूशन म्हणजेच ‘संकल्प’ एकट्यापुरते सीमित न ठेवता त्याविषयी आप्तेष्टांशी मोकळेपणाने चर्चा केली जाते. इतरांचे मार्गदर्शनदेखील घेतले जाते. विचारांती परिपूर्ण नियोजनातून ‘न्यू इयर रिझोल्यूशन’ केले जाते.

प्रत्येक जण संकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रयत्न करतात़ घुमजाव करणाºयांची संख्या कमी असते. म्हणून त्यांची नववर्ष ‘संकल्प’ या विषयीची भूमिका आणि संकल्पना समजून घेण्याचा मी प्रयत्न केला़ त्यातून ‘संकल्प’ करण्याची पद्धत समजली. त्यांच्या मते नववर्षाचे रिझोल्यूशन म्हणजे प्रत्येक व्यक्तीने स्वत:लाच दिलेले आव्हान असते. आपल्या अंगभूत कलागुणांचा योग्य वापर करणे. स्वत:ला मोकळेपणाने प्रश्न विचारणे. आयुष्याचे साध्य ठरवून त्याच्या पूर्ततेसाठीचे प्रयत्न निश्चित करणे. स्वत:च्या क्षमता तपासणे. त्यातून आयुष्याला स्थैर्य देणे. स्वत:ची सामाजिक प्रतिमा सुधारणे. चुका कमी करणे. आयुष्याकडे तटस्थपणे पाहणे. अशा अनेक अंगाने ‘रिझोल्यूशन’विषयी विचार करून, तयार करून नियोजित पद्धतीने  वर्षभर त्याचा पाठपुरावा केला जातो. अशी त्यांची कार्यपद्धती आणि विचारधारा सांस्कृतिक बाब बनली आहे.

यानिमित्ताने मागच्या वर्षातील अनुभवांचे कठोर मूल्यमापन करून नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतात. चांगली स्वप्नं पाहायची, ती पूर्णत्वाला न्यायची असा हा सतत उंची गाठणारा उपक्रम असतो. दुसºयाची चांगली कल्पना आवडली तर त्याचे अनुकरण करणे.आपले चांगले संकल्प इतरांना सांगणे, इतरांकडून योग्य सूचना स्वीकारणे. स्वत:ला शिस्त लावणे़ चांगला मित्र आणि जबाबदार माणूस बनणे असे आयुष्याला बळ देणारे रिझोल्यूशन करतात. स्वत:शी वचनबद्ध झाल्यामुळेच या गोष्टी घडू शकतात. अशक्य वाटणारे संकल्प न करता छोट्या गोष्टींपासून सुरुवात करून मोठ्या जबाबदाºया स्वीकारणारे ‘रिझोल्यूशन’ हे इथले वैशिष्ट्य म्हणता येईल. ‘मी कधीच संकल्प करीत नसतो’ असा बडेजाव इकडे नसतो. म्हणून नववर्षाच्या संकल्पाविषयी अधिक सकारात्मक वातावरण पाहायला मिळते. रिझोल्यूशनच्या माध्यमातून आपल्यातील वाईट गोष्टी, व्यसने, स्वभावदोष घालविणे शक्य होते. कुणाची निंदा करणार नाही असा साधा नियम आपले नातेसंबंध सुधारण्यास उपयोगी ठरू शकते. दिलेली आश्वासने पाळण्याचा संकल्प प्रतिष्ठा वाढविणारे ठरते.

कुटुंबासाठी जास्त वेळ देईन. आरोग्य, व्यायाम, छंद, मनोरंजन, प्रवास, नवनिर्मिती अशा गोष्टींबरोबर स्वत:साठी अधिक वेळ देईन. माझ्या जवळच्या माणसांचे रिझोल्यूशन यशस्वी व्हायला मदत करेन. इतरांच्या मतांचा आदर करेन अशा सकारात्मक गोष्टींच्या संकल्पातून अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात. ठरविलेल्या गोष्टी पाळल्या जातात. घुमजाव थांबते. संकल्प करणाºयाची टिंगलटवाळी होत नाही. संकल्प व्यक्तिगत असला तरी त्याला सामूहिक पाठिंबा मिळतो. चांगल्या संकल्पांचे मोकळेपणाने कौतुक होते. वाईट सवयी मोडण्यासाठी केलेल्या संकल्पांना इतरांपासून मदत दिली जाते. एकंदरीत ‘संकल्प’ करणे आणि ते सिद्धीस नेण्यासाठी पोषक वातावरण असल्यामुळे सामाजिक सामंजस्य वाढते. संकल्प सिद्धीसाठी प्रयत्न करणाºयांना सकारात्मक पद्धतीने सामावून घेतले जाते. केवळ स्वत:साठीच नव्हे तर इतरांसाठीदेखील संकल्प करून त्या पूर्ण केल्या जातात. एकंदरीत नवीन वर्षासाठी करायच्या ‘संकल्पा’विषयीचे उत्साहवर्धक आणि प्रोत्साहनपर वातावरण अनुकरणीय आहे़ म्हणून अशा चांगल्या गोष्टी आपल्यापर्यंत ‘दुनियादारी’च्या माध्यमातून पोहोचविण्याचा संकल्प नवीन वर्षाच्या निमित्ताने करतोय. तुम्हाला आवडेल ना.......-प्रा. विलास बेत (मेलबॉर्न आॅस्ट्रेलिया)(लेखक परिवर्तन चळवळीचे अभ्यासक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरNew Yearनववर्ष