शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सेवा देणाºया बस फेºया बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 12:31 IST

प्रवाशांचे हाल कायम; शहरातील गाड्या रिकाम्याच धावतात

ठळक मुद्देतोट्याचे कारण पुढे क़रून महापालिकेच्या परिवहन विभागाने ग्रामीण भागातील सिटी बसच्या फेºया बंद केल्याशहरात धावणाºया बसही रिकाम्या धावत असून, परिवहनला दररोज दीड लाख रुपयांचा फटका परिवहन उपक्रमातील काही अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या ४० बस सुरू

सोलापूर : तोट्याचे कारण पुढे क़रून महापालिकेच्या परिवहन विभागाने ग्रामीण भागातील सिटी बसच्या फेºया बंद केल्या आहेत. सध्या केवळ शहरात बससेवा सुरू आहे. शहरात धावणाºया बसही रिकाम्या धावत असून, परिवहनला दररोज दीड लाख रुपयांचा फटका बसत असल्याचे परिवहन अधिकाºयांकडून सांगण्यात येत आहे. 

मनपा परिवहन विभागाची बस शहरासह परिसरातील ३० किमी अंतरावरील प्रमुख गावांमध्ये जात असते. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य प्रवाशांना, विद्यार्थ्यांना या सेवेचा फायदा होतो. थकीत वेतनासाठी परिवहनच्या कर्मचाºयांनी बेमुदत संप पुकारला होता. प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर पाच दिवसांपूर्वी संप मागे घेण्यात आला. पुन्हा सेवा सुरू केल्यानंतर केवळ शहरात बस सोडण्यात येत आहेत. शहरात धावणाºया अनेक बस रिकाम्याच धावत आहेत. परिवहन उपक्रमातील काही अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या ४० बस सुरू आहेत. 

या बसच्या माध्यमातून मागील महिन्यात परिवहनला दररोज दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. यात सर्वाधिक वाटा ग्रामीण भागाचा होता. आता शहरातील फेºया वाढल्या आहेत, पण दररोज ५० ते ६० हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. मुळातच परिवहनला दररोज दोन लाख रुपयांचा तोटा होतो. त्यात नव्याने तोटा वाढल्यानंतर पुन्हा कर्मचाºयांच्या वेतनाचा आणि देखभाल दुरुस्तीचा खर्च उभा राहणार आहे. 

या गावातील सेवा बंद- मंद्रुप, चपळगाव, जेऊर, कर्देहळ्ळी, मुस्ती, बोरामणी, कासेगाव, विंचूर, खडकी-धोत्री, पितापूर, वडगाव, मार्डी, नान्नज, वडाळा, बीबीदारफळ, मोहोळ. 

ग्रामीण भागातील अनेक मार्ग तोट्यात चालवावे लागतात. परिवहनच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. पालकमंत्र्यांनीच ग्रामीण भागातील बससेवा बंद करा, असे आदेश दिले होते. या निर्णयाबाबत सर्व गटनेत्यांना कळविले. त्यांनी संमती दिल्यानंतरच सेवा बंद केली. शहरातील फेºया आणि ग्रामीण भागातील फेºयांमधून मिळणाºया उत्पन्नाची पडताळणी सुरू आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर या निर्णयावर फेरविचार होऊ शकतो. - गणेश जाधव, सभापती, परिवहन समिती.

उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्यातील भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर पक्षांचे नेते त्यांच्या आलिशान गाड्यांमधून सोलापूरला येतात. या नेत्यांना सर्वसामान्य शेतकरी, विद्यार्थ्यांच्या अडचणीची जाणीव नाही. गेल्या २० दिवसांपासून आम्ही बस सुरू करा म्हणून पाठपुरावा करतोय, पण महापालिका दाद द्यायला तयार नाही. यातून अवैध प्रवासी वाहतुकीला प्राधान्य मिळते. रिक्षा, जीपचालक मनमानी करून पैसे घेतात. परिवहनने यावर फेरविचार करायला हवा- जमीर शेख, शहर संघटक, प्रहार संघटना. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका