करमाळा : गेल्या दोन सप्ताहापूर्वी करमाळा तालुक्यात आलेल्या वादळीवाऱ्यामुळे व गारपिटीमुळे तालुक्यात वीजपुरवठा करणारे १३२ सिमेंट पोल व मुख्य लाईनचे २७ पोल वाकून व तारा तुटून पडले होते़ ते पुन्हा उभे न केल्याने ‘जैसे थे’ स्थिती आहे़ यामुळे जवळपास ३६० शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहेत़महावितरण कंपनीने तत्काळ हे पडलेले पोल उभे करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वीज कंपनीच्या सहायक अभियंत्यांकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.करमाळा तालुक्यात १५ दिवसांपूर्वी झालेल्या वादळीवारे व गारपिटीमध्ये वीज कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे़ यामुळे तालुक्यात अनेक भागात आजही वीज बंद आहे. याचा परिणाम शेतातील उभ्या पिकांना वीज पुरवठ्याअभावी पाणी देता येत नाही़ त्यामुळे पिके जळू लागली आहेत. पोल उभे करावेत या मागणीसाठी शेतकरी रोज वीज कंपनीच्या कार्यालयाकडे हेलपाटे मारीत आहेत. मात्र वीज कंपनीचे अधिकारी टोलवाटोलवीची उत्तरे देत आहेत. या प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष महेश चिवटे, कार्याध्यक्ष विवेक येवले, उपाध्यक्ष सुभाष परदेशी, हिवरवाडी येथील कैलास पवार, संजय खोमणे, वाशिंबे येथील आजिनाथ झोळ, तानाजी लिमकटे, सतीश टापरे, सुनील पवार, रोहिदास शिंदे, सदाशिव झोळ आदींनी वीज कंपनी कार्यालयात जाऊन सहायक अभियंता पोपटराव चव्हाण यांना पोल उभे करून विद्युतवाहिन्या जोडून खंडित वीज पुरवठा तत्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे.---------------------------शेतकरी प्रतिनिधी घेण्याची मागणी४वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील विद्युतवाहिन्या असलेले शेकडो पोल व वाहिन्यांचे नुकसान झाले आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सिमेंटचे १५० पोल व मुख्य लाईनच्या २७ पोलची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे करून सविस्तर अहवाल पाठविला आहे़ अद्याप आम्हाला हे पोल उपलब्ध झालेले नाहीत. पोल येताच सर्व पोल उभे करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे सहायक अभियंता पोपटराव चव्हाण यांची सांगितले़-------------------------------शेतकऱ्यांचे वीज बिल थकले तर कंपनीच्या वतीने तत्काळ वसुली मोहीम राबवून वीज कनेक्शन बंद केले जाते. थकीत बिलावर व्याज लावले जाते़ कंपनीची तत्काळ पोल उभे करण्याची जबाबदारी नाही काय?- संजय खोमणे शेतकरी, हिवरवाडी
३६० शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद
By admin | Updated: June 16, 2014 01:27 IST