शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पंढरीतील तुळशी वृंदावन भाविकांसाठी पुन्हा खुले, वन विभागाने केले होते बंद

By रवींद्र देशमुख | Updated: January 9, 2024 19:21 IST

संत चोखामेळा, संत एकनाथ महाराजांचे मंदिर कोसळल्यानंतर वन विभागाने केले होते तुळशी वृंदावन बंद

रवींद्र देशमुख

सोलापूर : पंढरपूर येथील तुळशी वृंदावनामधील संत चोखोबा आणि संत एकनाथ महाराज यांची मंदिरे पडली होती. यामुळे वन विभागाने खबरदारी घेत तुळशी वृंदावन भाविकांसाठी बंद ठेवले होते. तब्बल एक वर्षापासून बंद असलेले भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत. शहरातील यमाई तलावाच्या शेजारी कोट्यावधी रुपये खर्चून तुळशी वृंदावन तयार करण्यात आले आहे. या तुळशी वृंदावनाचे सन २०१९ मध्ये तत्कालीन

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. तुळशी वृंदावनामुळे पंढरपूर शहराच्या वैभवात वाढ झाली आहे. तुळशी वृंदांमध्ये असलेल्या संत चोखामेळा, संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत नामदेव या प्रमुख संतांची मंदिरे पाहण्यासाठी पंढरीत आलेले भाविका आवर्जून जातात. 

परंतु तुळशी वृंदावनातील संत चोखामेळा यांचे संगमरवरी मंदिर मार्च महिन्यात अचानक कोसळले होते. त्याच वेळी श्री चोखामेळा यांचे वंशज सुनील सर्वगोड व ॲड कीर्तीपाल सर्वगोड यांनी सर्वच मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. अशी मागणी केली होती. परंतु वन विभागाने याकडे दुर्लक्ष केले होते.  यानंतर आ. समाधान आवताडे यांनी वन विभागाकडून निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करत विधानसभेत प्रश्न मांडला होता. त्याचबरोबर एप्रिल महिन्यात श्री संत एकनाथ महाराजांचे मंदिर ही कोसळले.

यावेळी ही आ. समाधान आवताडे यांनी सर्वच मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे अशा सूचना दिल्या होत्या. वन विभागाने खबरदारी म्हणून त्या परिसरात असलेल्या इतर संतांचे मंदिरे सोमवारी उतरवून घेतली आहेत. परंतु सर्व मंदिरे दुरुस्त करून पुन्हा व पूर्णबांधणी करून तुळशी वृंदावन भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले.

टॅग्स :Pandharpurपंढरपूर