शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील मंगळवार बाजार बनला गरिबांचा मॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 13:58 IST

अ‍ॅण्टिक पीससाठी बाजारवारी; एका पार्टसाठी विकत घेतल्या जातात जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू

ठळक मुद्देमंगळवार बाजारातील जुन्या बाजारात दुर्मिळ वस्तू (अ‍ॅण्टिक पीस) शोधणाºयांचा एक वर्गलक बाय चान्स लागला तर भंगारातून घेतलेल्या या वस्तू किमान सहा महिन्यांसाठी हमी देत असतातजुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारात फेरफटका मारताना हौशी सोलापूरकर अ‍ॅण्टिक पीस घेण्याच्या शोधात दर मंगळवारी बाजारवारी करीत असतात

सोलापूर : टाकून दिलेल्या अन् भंगारात गेलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू... कधी-कधी यामधील एखादा पार्ट कामाचा असतो. तो पार्ट हवा असेल तर ती वस्तूच विकत घ्यावी लागते. लक बाय चान्स लागला तर भंगारातून घेतलेल्या या वस्तू किमान सहा महिन्यांसाठी हमी देत असतात. जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारात फेरफटका मारताना हौशी सोलापूरकर अ‍ॅण्टिक पीस घेण्याच्या शोधात दर मंगळवारी बाजारवारी करीत असतात.

ब्रिटिशकालीन मंगळवार बाजारात केवळ भाजीपाला, धान्य अन् संसारोपयोगी साहित्यच मिळते असे नाही. जुन्या चपलांपासून ते सायकली, टाकून दिलेल्या शर्ट, पॅण्ट, साड्यांपासून ते जुनी पुस्तके, जुने लोखंडी साहित्यापासून ते इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा बाजार याच बाजारात वर्षानुवर्षे भरतो आहे. 

या बाजारात जुने मोबाईल, चॉर्जर, बॅटºया, पॉवर बँक, टी. व्ही. हेडफोन, रेडिओ, लॅपटॉप विक्रीचा जणू उघडा मॉल भरलेला असतो. आपल्याला नेमकी कुठली वस्तू हवी असेल तर कधी-कधी मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप रिपेअर करणाºया मेकॅनिकचा सल्ला घेऊन अथवा कधी-कधी त्यांना सोबत घेऊन ग्राहक जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करीत असतात. 

मंगळवार बाजारातील जुन्या बाजारात दुर्मिळ वस्तू (अ‍ॅण्टिक पीस) शोधणाºयांचा एक वर्ग आहे. सकाळी साडेनऊ ते दुपारी १२ पर्यंत असे ग्राहक आवर्जून बाजारात दिसत असतात. 

जुना मोबाईल घ्या... बदला डिस्प्ले!- कधी-कधी मोबाईल हाताळताना हातातून तो खाली पडतो. मोबाईलचा डिस्प्ले आणि स्क्रीन खराब होतो. नव्याने तो बदलून घ्यायचे म्हटले तर अधिक खर्च येतो. यासाठी आपल्याजवळील जो मोबाईल आहे, त्याच मोबाईलचा शोध ग्राहक बाजारात घेत असतात. मिळाला तर दीड-दोनशे रुपयांमध्ये तो मिळूनही जातो. मग त्या मोबाईलचा डिस्प्ले वापरून कसे-बसे कामही भागते.

विक्रीस आलेल्या वस्तू भंगारातही जातात !- मंगळवार बाजारात विक्रीस येणाºया सर्वच जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची हमी मिळत नाही. मुंबईहून एका लॉटमध्ये या वस्तू व्यापाºयांना विकत घ्यावे लागतात. त्यातील ६० ते ७० टक्के वस्तूंची विक्री होते. राहिलेल्या वस्तू कवडीमोल किमतीने भंगारवाल्यांना द्यावे लागते, असे गेल्या २६ वर्षांपासून व्यवसाय करणारे इरफान शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

एखादी दुर्मिळ वस्तू मिळाली तर त्याचा अधिकच आनंद असतो. अशा वस्तू घर अथवा दुकानांमध्ये खास आकर्षण ठरत असतात. अशा वस्तूंचा शोध मी दर मंगळवारी एक फेरफटका मारून घेत असतो.-गिरीश शंकू, व्यापारी.

टॅग्स :SolapurसोलापूरMarketबाजारMobileमोबाइल