शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

ट्रक, टेम्पोच्या पार्किंगने व्हीआयपी रस्ता केवळ दुपदरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 15:02 IST

सोलापूर शहरातील प्रमुख बाजारपेठांमधील रस्तेही मोकळा श्वास घेईनात

ठळक मुद्देविमानतळ ते पार्क चौक हा व्हीआयपी समजला जाणारा चौपदरी मार्ग ट्रक, टेम्पो, कार पार्किंगने दुपदरी बनलायरस्त्याच्या कडेला जड वाहनांच्या थांब्यामुळे प्रमुख आणि जुन्या बाजारपेठांमधील रस्त्यांचा तर अक्षरश: जीव गुदमरतोय

सोलापूर : मोकळा श्वास घेणाºया रस्त्यांचे दर्शन इथे घडतेच कुठे? सर्वसामान्य सोलापूरकरांच्या या प्रश्नाचे उत्तर आजतागायत मिळाले नाही. विमानतळ ते पार्क चौक हा व्हीआयपी समजला जाणारा चौपदरी मार्ग ट्रक, टेम्पो, कार पार्किंगने दुपदरी बनलाय. रस्त्याच्या कडेला जड वाहनांच्या थांब्यामुळे प्रमुख आणि जुन्या बाजारपेठांमधील रस्त्यांचा तर अक्षरश: जीव गुदमरतोय. सोमवारी ‘लोकमत चमू’ने केलेल्या आॅन दि स्पॉट रिपोर्टिंगवेळी ट्रक, टेम्पोचालकांनी वाहनतळ नसल्याने वाहने कुठे लावायची? असा प्रश्न उपस्थित केला.

दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी ‘लोकमत’ चमू विमानतळहून निघाला. तेथून आसरा चौकाच्या दिशेने येत असताना मजरेवाडीनजीक रस्त्यावरच एक खासगी बस रस्त्याच्या कडेला थांबली होेती. त्या भागातील काही लोकांना बोलते केले असता त्यांनी मुलतानी ते शिवशाहीपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही कडेला वाहने थांबलेली असतात. शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ठोस कारवाई करावी, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखविली. आसरा चौक ते महावीर चौकापर्यंतच्या रस्त्याचा दोन्ही भाग कार पार्किंगने व्यापल्याचे चित्र चमूतील छायाचित्रकाराने आपल्या कॅमेºयात कैद केले. हेच चित्र पुढे गांधी नगर, सात रस्ता, डफरीन, पार्क आणि छत्रपती शिवाजी चौकापर्यंत नजरेत भरले. 

दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी चमू थेट भुसार गल्लीतील प्रमुख बाजारपेठेत पोहोचला. मंगळवारपेठ चौकी-भुसार गल्ली आणि पुढे कुंभार वेस या मार्गाच्या दोन्ही बाजूला टेम्पो थांबलेल्या होत्या. या मार्गावरून येणाºया-जाणाºया वाहनधारकांना तारेवरची कसरत करत यावे लागत होते. काही व्यापाºयांना बोलते केले असता त्यांनी ‘आमच्या दुकानी ट्रक, टेम्पोद्वारे माल येत असतो. तो माल उतरवून घेईपर्यंत वाहने दुकानांसमोरच थांबवून घ्यावी लागतात. माल रिकामा केल्यावर ती वाहने तेथेच थांबतात. यावर महापालिका आणि संबंधित पोलीस खात्याने पर्याय शोधावा’ असा सूर आळवला. मंगळवार पेठ पोलीस चौकी ते सराफ बाजार आणि पुढे मधला मारुती, मधला मारुती ते कोंतम चौक आणि टिळक चौक, टिळक चौक ते बाळीवेस, मधला मारुती ते माणिक चौक आणि पुढे विजापूर वेस हे सर्वच मार्ग कार, रिक्षा, टेम्पो, ट्रकने व्यापलेले दिसले.

जयभवानी प्रशालेच्या मैदानाचा पर्याय- कुंभार वेस, भुसार गल्ली, सराफ बाजार, चाटी गल्ली, माणिक चौक, कोंतम चौक, बाळी वेसचा परिसर जुना बाजारपेठांचा म्हणून परिचित आहे. केवळ शहरातीलच नव्हे तर इतर जिल्हे आणि परप्रांतातील व्यापारी बाजारपेठांत येत असतात. इतर जिल्ह्यांतून अथवा परराज्यांतून आलेला माल ट्रकद्वारे बाजारपेठांमधील व्यापाºयांच्या दुकानात, गोदामात उतरविला जातो. माल उतरविल्यानंतर ट्रक, टेम्पो इथला माल घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत. तोपर्यंत ही वाहने थांबवायची कुठे? असा प्रश्न पडतो. यासाठी या बाजारपेठांपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जयभवानी प्रशालेच्या मैदानावर वाहनतळाचा पर्याय होऊ शकतो, अशी सूचना काही व्यापाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडली. 

जोडभावी पेठेत मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय, राज्यस्तरावरील माल वाहतूक करणाºया कंपन्या (ट्रान्स्पोर्ट) आहेत. या कंपन्यांना ट्रक पुरवणारे एजंटही आहेत. अनेक ट्रकचालक मालाच्या प्रतीक्षेत असताना त्यांच्यासाठी वाहनतळांची सोय नाही. महापालिकेने वाहनतळांची सोय करावी.-रोशन भुतडा, व्यापारी.

टॅग्स :SolapurसोलापूरTrafficवाहतूक कोंडीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसMarketबाजार