शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यविधीनंतर उरकून निघालेल्या महिलांच्या जमावात ट्रक धुसला; दोन सूना ठार, तिघे जखमी 

By काशिनाथ वाघमारे | Updated: May 20, 2023 19:04 IST

अंत्यसंस्कारासाठी जमलेले सर्व पाहुणे गुरसाळे गावच्या स्मशानभूमीत आले.

काशिनाथ वाघमारे, सोलापूर: सासऱ्याच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या दोन सुनांचा माघारी येताना वाटेत ट्रकच्या धडकेने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास गुरसाळे (ता. पंढरपूर) येथे घडली आहे. हिराबाई भारत गुटाळ (वय ३५) व मुक्ताबाई गोरख गुटाळ (वय ४०) असे अपघातात मरण पावलेल्या दोन सुनांची नावे असून शनिवारी रात्री ११ वाजता हा अपघात झाला. 

पुनर्वसन टाकळी - गुरसाळे (ता. पंढरपूर ) येथील गेनदेव मनोहर गुटाळ यांचे शुक्रवार, १९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता रोजी निधन झाले.  अंत्यविधीसाठी त्यांचा मुलगा गोरख गुटाळ हे मुक्ताबाई गुटाळ यांच्यासह कुगाव (ता. करमाळा) येथून पुनर्वसन टाकळी - गुरसाळे येथे आले होते. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कारासाठी जमलेले सर्व पाहुणे गुरसाळे गावच्या स्मशानभूमीत आले.

अंत्यविधी उरकून घरी परत निघालेल्या शोकाकूल महिलांच्या जमावात करकंबहून भरधाव वेगात निघालेला (टी.एन. ५२/ एम. ३५६४) मालट्रक घुसला. यामुळे  लोकांची धावपळ झाली. या अपघातात मयत गेनदेव गुटाळ यांच्या सून हिराबाई भारत गुटाळ (वय ३५) व मुक्ताबाई गोरख गुटाळ (वय ४०) या दोन सुनांचा मृत्यू झाला तर दत्तात्रय अजिनाथ सरडे, सुनीता महादेव गुटाळ, आनंदाबाई धनेश्वर साळुंखे (तिघेही रा. चिखलठाण, ता. करमाळा), सुधामती साहेबराव धुमाळ (रा. सिद्धेश्वर निंबवडी, ता. बारामती), अनिता उर्फ गीतांजली जयहिंद देवकर (रा. सुगाव भोसे, ता. पंढरपूर) हे जखमी झाले. त्यांच्यावर  खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने कुगाव (ता. करमाळा) व पुनर्वसन टाकळी - गुरसाळे (ता. पंढरपूर) या गावांत हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Accidentअपघात