शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

ज्वारीचा भाव वधारल्यानं कष्टाची भाकर झाली महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 12:50 IST

संतोष आचलारे सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे ज्वारीच्या उत्पादनात घट होऊन दरवाढ झाली आहे. त्यामुळे गरिबांच्या चुलीवरील भाकर आता श्रीमंतांच्या ...

ठळक मुद्देगरीब कुटुंबात चपातीला पसंतीहॉटेल्समध्ये एका भाकरीची किंमत पंधरा रुपये बाजारात ४० रुपयांपेक्षा जास्त दराने एक किलो ज्वारी

संतोष आचलारे

सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे ज्वारीच्या उत्पादनात घट होऊन दरवाढ झाली आहे. त्यामुळे गरिबांच्या चुलीवरील भाकर आता श्रीमंतांच्या गॅसकडे फिरत आहे. ज्वारीचे उत्पादनाच प्रचंड कमी झाल्याने ग्रामीण भागातही चुलीवर सर्रास चपाती दिसू लागली आहे. सोलापुरात हॉटेल्स, खानावळीत १५ रुपयाला एक भाकर मिळत असल्याने गरिबांची भाकर, श्रीमंतांची ठरत आहे. 

गत दोन वर्षांपासून ज्वारीच्या उत्पादनात घट झाली आहे. यंदाच्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे जेमतेम ज्वारीची १५ ते २० टक्केच पेरणी झाली आहे. त्यामुळे यापुढील काळात गरिबांची भाकर आणखीनच महागणार आहे. सोलापुरात किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपये प्रति किलो दराने ज्वारीची विक्री होत आहे. हॉटेल व ढाब्यावर १५ रुपयाला एक याप्रमाणे भाकर ग्राहकांना देण्यात येत आहे. चपाती दहा रुपयाला एक मिळत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांची पसंती चपाती खाण्याकडेच दिसून येत आहे. 

सोलापूर जिल्हा ज्वारीच्या उत्पादनासाठी राज्यभर प्रसिद्ध आहे. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा पाऊसच नसल्याने ज्वारीची पेरणी झाली नाही. पेरणी कमी झाल्याने व मागील वर्षातील ज्वारीच्या कमी उत्पादनामुळे दरवाढ सातत्याने होताना दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी तब्बल ५० टक्क्यांपेक्षा जास्त दरवाढ झाल्याची माहिती किरकोळ दुकानदारांकडून देण्यात येत आहे. शेतकरी व कष्टकरी वर्गात भाकरी अधिक प्रेमळ आहे.

पिटलं अन् भाकर असे समीकरणच गरीब कुटुंबात खाण्यासाठी असते. मात्र ४० रुपये किलोची ज्वारी घेण्यापेक्षा बाजारातील ३० रुपये किलोचा गहू किंवा रेशन दुकानातील गहू खरेदी करण्याकडे कल सर्वसामान्य कुटुंबाचा दिसून येत आहे. पूर्व भागातील टॉवेल कारखान्यात व विडी उद्योगात काम करणाºया महिलांचा स्वस्त अन्न म्हणून रेशनचा गहू खरेदीकडे कल दिसून येतो. ज्वारीचे दर जास्त असल्याने महिन्यातून एकदा सणाप्रमाणे भाकर करण्याची प्रथाच सर्वसामान्य कुटुंबात होत आहे. 

जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाºया शेतकरी कुटुंबातही यंदा ज्वारीची पोती गायब झाली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांना आता केवळ रेशनच्या गव्हाचा पर्याय उरला आहे. दुष्काळी परिस्थितीने पाटील किंवा देशमुखांच्या वाड्याभोवती यंदा भाकर फिरताना दिसून येत आहे. 

ज्वारीच नाही...च्दुष्काळामुळे ज्वारीचं पीकच येत नाही. बाजारात ४० रुपयांपेक्षा जास्त दराने एक किलो ज्वारी मिळत आहे. त्यामुळे भाकरी नाईलाजाने १५ रुपयाला एक याप्रमाणे विकण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयासमोर भाकरी विकणाºया मलिका शेख यांनी दिली. 

चुलीवरील भाकरीची चवच निराळी असल्यानं आमच्यासारख्या सर्वसामान्यांची भाकर आवडती होती. मात्र चपातीपेक्षा भाकरी खूपच महाग झाल्यानं आता भाकर श्रीमंतांनीच खावी, आमच्यासारख्या सर्वसामान्यांनी नव्हे अशी प्रतिक्रिया भाकर खाण्यासाठी आलेला युवक अमर पाटील यांनी दिली. - अमर पाटीलग्राहक.

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीhotelहॉटेलagricultureशेतीFarmerशेतकरी