लोकमत न्यूज नेटवर्क, पंढरपूर : १५ ऑगस्ट हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे. भाविकांसाठी स्वातंत्र्य दिनानिमित्तपंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात फुलापासून तिरंगा ध्वजाच्या रंगाची सजावट मनमोहक अशी सुंदर आरास करण्यात आली आहे.
प्रत्येक हिंदू सण, उत्सव, स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन या दिवशी श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात येत असते. याच एक भाग म्हणून ७७व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ही विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या चारखांबी, सोळखांबी, विठ्ठल मंडप, रुक्मिणी मंडप यादी परिसरात फुलांची सजावट करण्यात आली आहे. राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या फुलांचा वापर सजावटीसाठी करण्यात आला आहे.
विठ्ठल व रुक्मिणी नामदेव पायरीजवळ व श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडप परिसरात राष्ट्रध्वजाच्या रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. यामुळे या भाविकांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी अधिक गर्दी केली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात केलेली भारतीय राष्ट्रध्वजासारखी तिरंगी आकर्षक सजावट.