शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
2
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
6
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
7
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
8
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
9
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
11
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
12
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
13
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
14
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
15
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
16
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
17
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
18
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
19
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
20
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

माढा परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ

By admin | Updated: June 30, 2014 13:38 IST

माढा शहर व परिसरात शनिवारी पहाटे दहा ते बारा दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवत धुमाकूळ घातला. चार ते पाच ठिकाणी जे काही हाती लागेल ते घेऊन दहशत निर्माण करीत पोबारा केला.

 

माढा : माढा शहर व परिसरात शनिवारी पहाटे दहा ते बारा दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवत धुमाकूळ घातला. चार ते पाच ठिकाणी जे काही हाती लागेल ते घेऊन दहशत निर्माण करीत पोबारा केला. कदम वस्तीवर शस्त्रांचा धाक दाखवत सोने, चांदीच्या दागिन्यांसह एक लाखाचा ऐवज लंपास केला. याच दरम्यान पोलिसांना कळवूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने बिनबोभाटपणे पलायन करण्यात दरोडेखोर यशस्वी झाले. पोलिसांच्या निष्क्रियतेबद्दल नागरिकांतून प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला आहे.
माढा-पंढरपूर रस्त्यावरील उपळाई (बु.) येथील संतोष आप्पाराव वागज यांना शस्त्राचा धाक दाखवून हँडसेट व कपडे चोरुन नेले. याच रस्त्यावरील मदर इंग्लिश मीडियम स्कूलजवळील चहाची टपरी फोडून त्यातील सामान घेऊन पोबारा केला.
माढा-वडशिंगे रस्त्यावरील बेंद शिवारात शेतामध्ये विजयसिंह संजय साठे हे इंडिका कारमध्ये झोपले होते. याच दरोडेखोरांनी त्यांना गाडीतून उठवून मारहाण करुन शस्त्राचा धाक दाखवत कानातील सोन्याची बाळी घेऊन लंपास केला.
माढा-बाश्री रस्त्यावरील कदम वस्ती येथे पहाटे ३.१0 वाजता दरोडेखोरांनी चाल केली. सहा ते सात चोरट्यांनी शस्त्रांचा धाक दाखवून प्रकाश भागवत कदम, त्यांची पत्नी सुलभा प्रकाश कदम व मुलांसमोर दहशत निर्माण केली. घरातील सर्व मौल्यवान वस्तू द्या अन्यथा जीवे मारण्याची धमकी दिली. कदम यांच्या घरातील सोन्याचे गंठण, सोन्याच्या अंगठय़ा, कर्णफुले, दहा हजार रुपये असा ८५ हजारांचा ऐवज लंपास केला.
दरोडेखोरांनी प्रकाश कदम यांना डांबून ठेवले होते, तसेच शस्त्राचा धाक दाखवत मारहाण करण्याची, गंभीर जखमा करुन मारण्याची धमकी देत होते, त्यामुळे घरातील सर्व मौल्यवान वस्तू सुलभा कदम यांनी काढून दिल्या. जाताना दरोडेखोरांनी घराचे दरवाजे बाहेरुन बंद करुन शेतातील पश्‍चिम दिशेने पोबारा केला.
नागरिकांत संताप; पोलीस पंचनामा
या दरोड्याच्या घटनेनंतर शहरातील नागरिकांत प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला. यानंतर दुपारी १२ वाजता पोलीस अधीक्षक मकरंद रानडे, एम. जी. ठोंबरे, नितीन कौसगडेकर यांच्यासह पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. श्‍वानपथकाने रेल्वे लाईन्स जवळील बेंदनाला पर्यंत माग दाखवून त्याच ठिकाणी घुटमळून परत आले. (वार्ताहर)
अंगावर शहारे आणणारी दहशत ■ दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवून धुमाकूळ घातला, त्याची माहिती सुलभा कदम यांनी दिली, ती ऐकताना अंगावर शहारे येत होते. प्राणायाम करण्यासाठी सुलभा कदम पहाटे उठल्या होत्या.याचदरम्यान दरोडेखोरांनी वस्तीवर प्रवेश करुन धुमाकूळ घातला. दरोडा घालून गेल्यानंतर सुलभा कदम यांनी माढा पोलीस स्टेशनला फोन करुन ही घटना सांगितली. दरोडेखोर हे कुडरूवाडी वळणावरील पेट्रोलपंपाजवळ सापडतील, सर्वत्र नाकेबंदी करावी अशी विनंती केली. मात्र माढा पोलीस झोपेतून जागेच झाले नाहीत. त्यामुळे दरोडेखोरांना पळून जाण्यासाठी वाट मोकळी झाली. 
हवेत गोळीबार.. ■ पोलीस स्टेशनजवळ असलेल्या साठे गल्लीतील अविनाश जयसिंग साठे यांच्या घराचा दरवाजा उघडून फिर्यादीच्या आई विमल जयसिंग साठे यांना चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम, सोने, चांदीचे दागिने लंपास केला. साठे गल्लीतील शहाजी साठे यांच्या घराची खिडकी उघडली. त्यांनी हवेत गोळीबार केल्यानंतर दरोडेखोर पळून गेले.