शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

तुंगतमध्ये पाऊणतास वाहतूक रोखली; दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी संघटना रस्त्यावर

By काशिनाथ वाघमारे | Updated: July 29, 2023 18:25 IST

आंदोलकांनी लक्ष वेधले : वाहनांची रांग दोन किलोमीटर लागली

काशिनाथ वाघमारे, सोलापूर : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पंढरपूर-मोहोळ रस्त्यावर तुंगत येथे शनिवारी सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन केले. जवळपास पाऊणतास हे आंदोलन चालले आणि या वेळेत जड वाहनांची रांग ही दोन किलोमीटरपर्यंत ठप्प झाली.

दहा दिवसांपूर्वी राज्य सरकारने एक अध्यादेश काढला. अध्यादेशामध्ये गाईच्या दुधाला ३४ रुपये दर जाहीर केला. या निर्णयामुळे बरेच शेतकरी खूश झाले. तीन महिन्यांपूर्वी दुधाचे दर ३२ रुपयांपेक्षा खाली आले होते. राज्यभर आंदोलने झाली. दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अध्यादेश काढला. परंतु त्या अध्यादेश काढताना दुधाच्या दरपत्रकाचा उल्लेख केला नसल्यामुळे दूध संघचालकांचा मनमानी कारभार सुरू झाला. शेतकऱ्याची फसवणूक असल्याचा आरोप सोलापूर युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी यावेळी केला.

जिल्हा दुग्धविकास अधिकारी व्ही. डी. पाटील, नायब तहसीलदार पंडित कोळी आणि पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील, पप्पू पाटील, नवनाथ रणदिवे, कमलाकर देशमुख, सचिन आटकळे, शहाजान शेख, मदन जाधव, बापूसाहेब वाघमोडे, शिवाजी सांवत, नानासाहेब चव्हाण, विश्रांती भुसनर, विश्वनाथ गायकवाड, शिरीष रणदिवे, राम नागणे, औदुंबर गायकवाड, बाहुबली सावळे, नामदेव कोरके दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना