शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

सव्वीस दिवसांमध्ये शहरातील २६ प्रभागांत फिरणार : श्रीकांचना यन्नम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 10:11 IST

सोलापुरातील महिलांचे प्रश्न मार्गी लावणार : ‘लोकमत’ भवनला सदिच्छा भेटीत नूतन महापौरांनी व्यक्त केला संकल्प

ठळक मुद्दे पहिले काम हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे - यन्नमशहरातील गावठाण भागात स्मार्ट सिटीची कामे होत आहेत - यन्नमहद्दवाढ भागातील समस्या सोडविण्यावर भर देणार - यन्नम

सोलापूर : शहरात येत्या २६ दिवसांत २६ प्रभागांत फिरून लोकांचे प्रश्न समजावून घेणार असल्याचा संकल्प नूतन महापौर श्रीकांचना यन्नम यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केला.

महापौर निवड झाल्याप्रीत्यर्थ श्रीकांचना यन्नम यांनी गुरूवारी सायंकाळी ‘लोकमत भवन’ला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत महिला व बालकल्याण सभापती रामेश्वरी बिर्रू, नगरसेविका राधिका पोसा, रमेश यन्नम, दत्तात्रय पोसा, यशवंत पात्रुड, श्रीगणेश बिराजदार उपस्थित होते. महापौर यन्नम यांनी पहिले काम हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे करणार असल्याचे सांगितले. हद्दवाढ भागात अपरात्री पाणी येते. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागते. ही समस्या पहिल्यांदा सोडविणार आहे. 

शहरातील गावठाण भागात स्मार्ट सिटीची कामे होत आहेत. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडत आहे. ही कामे पूर्ण करून घेण्याबरोबर हद्दवाढ भागातील समस्या सोडविण्यावर भर देणार आहे. शहर स्वच्छ व सुंदर राहील, याकडे कटाक्ष असणार आहे. रस्ते, ड्रेनेज आणि महिलांच्या स्वच्छतागृहाचा प्रश्न आहे. हे काम तर मी प्राधान्याने करणार आहेच, पण लोकांच्या मनात नेमके काय आहे हे जाणून घेण्यासाठी पुढील २६ दिवस २६ प्रभागात फिरणार आहे. लोकांनी भेटायला येताना किमान एकतरी सूचना करावी. समस्यांचा पाढा वाचण्याऐवजी काय करता येते हे सांगितले तर उपाययोजना करणे सोपे होणार आहे. 

महापालिकेचा कारभार सर्वांना विश्वासात घेऊन करणार असल्याचे महापौर यन्नम यांनी सांगितले. भाजपमध्येच दोन गट आहेत, सभागृहात कामकाज करू देतील काय, असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, चार वेळा निवडून आले आहे. सर्वांचे सहकार्य राहिले आहे. महापौर निवडणुकीच्या वेळीच हा चमत्कार सर्वांनी पाहिला आहे. त्यामुळे मला सर्वांची साथ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

परिवहनला देणार ऊर्जितावस्था- शहरातील गरिबांच्या सेवेत असणारी सिटी बस महापालिकेची आहे. त्यामुळे परिवहनला ऊर्जितावस्थेत आणण्यावर आपला भर राहील, असे महापौर श्रीकांचना यन्नम यांनी सांगितले. देसाई नगराला पहिली बस मी सुरू केली. मी बसमध्ये फिरत होते. लोक माझं नाव घेऊन बस सुरू केल्याचे श्रेय द्यायचे. पण ती नगरसेविका मीच आहे हे त्यांना माहीत नसायचे. लोकांच्या या प्रतिक्रिया ऐकून मला बरे वाटायचे. आता बससेवा सुरळीत नाही. ती सुरळीत कशी होईल, याकडे मी लक्ष देणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSmart Cityस्मार्ट सिटीWomenमहिला