आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २१ : येथील टॉवेल व्यापारी जालंधर सिद्राम चन्ना (वय ४५,रा.भवानी पेठ) यांचे १५ लाख ४ हजार रुपयांचे टॉवेल घेऊन तामिळनाडू व मुंबईच्या व्यापाऱ्यांनी पैसे न देता त्यांची फसवणुक केली. यासंदर्भात चन्ना यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दिल्यानंतर आठ महिन्यानंतर फसवणुकीचे हे प्रकरण उघडकीस आले.या प्रकरणी रघु पांडीत शेट्टी (रा.कोटुर,ता.बरगुर.जि.कृष्णगीरी, राज्य तामिळनाडूू),अरविंद नारायण (रा.काळबा देवी रोड मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत. आरोपीने फिर्यादीच्या कारखान्यातुन तसेच त्यांच्या सासरे व इतर व्यापाऱ्या कडून वेळोवेळी टॉवेलची खरेदी केली. त्याची रक्कम न देता धनादेश देवुन अमिष दाखवले. गेल्या आठ महिन्यांपासून फिर्यादीस पैसे देण्यास टाळटाळ करीत होते. आरोपीने १५ लाख ४ हजार ७२२ रुपयांचे टॉवेल विकत घेवुन त्यांची फसवणुक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्या दोन व्यापाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास सपोनि शेख करत आहेत.
सोलापूरात टॉवेल व्यापाऱ्यास १५ लाखाला गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 13:56 IST