शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आज सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा; साहित्य खरेदीचा प्रस्ताव मागे ठेवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 11:20 IST

विलंबाचे कारण केले पुढे, ड्रेनेजच्या विषयावर होणार आज वादळी चर्चा

ठळक मुद्दे प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी आज शनिवार रोजी सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आलीआता आणखी एक महिना साहित्याची प्रतीक्षा करावी लागणार

सोलापूर : मनपा चतुर्थश्रेणी कर्मचाºयांना देण्यात येणाºया साहित्याच्या खरेदीचा प्रस्ताव मार्च महिन्याच्या सभेत टाळण्यात आला आहे. स्थायी सभा न झाल्यामुळे कर्मचाºयांना आता आणखी एक महिना साहित्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

स्थायी समिती सभापती निवड प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्यामुळे मार्च महिन्यात स्थायी समितीच्या सभा झाल्या नाहीत. त्यामुळे खरेदीचे प्रस्ताव मान्यतेसाठी अडकले आहेत. असे प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी आज शनिवार रोजी सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली आहे. या सभेत प्रशासनाने सफाई कर्मचाºयांना साहित्य व गणवेश खरेदीचा ३0 लाख खर्चाचा प्रस्ताव पाठविला होता. पण महापौर शोभा बनशेट्टी यांनी हा प्रस्ताव पुरवणीमध्ये घेतलेला नाही.

मनपा प्रशासनाकडून हा प्रस्ताव उशिरा पाठविण्यात आल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.  त्याचबरोबर १८0 कोटींचे ड्रेनेजचे टेंडर दास आॅफशोअरला देण्याचा प्रस्ताव सभेसमोर ठेवण्यात आला आहे. वास्तविक हे टेंडर मंजुरीसाठी स्थायी सभेकडे जाणार होते. पण स्थायी सभेला विलंब होत असल्याने सर्वसाधारण सभेकडे हे टेंडर पाठविण्यात आले आहे. यामुळे स्थायी समितीचे सदस्य अस्वस्थ झाले आहेत. आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दास आॅफशोअरने कमी दराने हे टेंडर भरले असले तरी या कंपनीच्या कामाबाबत नागरिकांची नाराजी आहे. यापूर्वी जुळे सोलापूर, होटगी व विजापूर रोड परिसरातील ड्रेनेजचे काम या कंपनीने केले आहे. हे काम नुकतेच संपण्याच्या मार्गावर असल्याने आहे त्याच मनुष्यबळावर कमी खर्चात आता नवीन ड्रेनेज योजनेचे काम करण्याची तयारी या कंपनीने दाखविली आहे.

ये रे माझ्या मागल्या नको ! - जुळे सोलापुरात काम करताना या कंपनीने बेफिकीरी दाखविल्याने शाळकरी मुलाचा बळी गेला. यामुळे नागरिक संतप्त झाल्याने काम बंद ठेवावे लागले होते. ड्रेनेज खोदाईनंतर रस्त्यांची कामे व्यवस्थितपणे करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे नवीन काम करताना ही कंपनी याच पद्धतीने काम करेल अशी सदस्यांची तक्रार आहे. त्यामुळे या सभेत या प्रस्तावावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. 

सभेच्या कार्यक्रम पत्रिकेचा एकही प्रस्ताव माझ्याकडे आलेला नाही. महापौर सभेतील विषय ठरवितात. साहित्य खरेदीच्या प्रस्तावाबाबत मला माहिती नाही. पार्टी मिटिंगमध्ये या विषयावर चर्चा करू. - संजय कोळी, सभागृहनेते

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका