शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर मद्य बाळगणाºया आरोपींना तीन वर्षांची शिक्षा, दारूबंदी न्यायालयाचा निकाल, पुणे विभागातील पहिलीच शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 09:27 IST

गोवा येथील विदेशी मद्याचा साठा बेकायदेशीरपणे सोलापूर जिल्ह्यातून कर्नाटक राज्यात विक्रीस नेणाºया तीन आरोपींना दारूबंदी न्यायालयाने कलम ६५ इ, ए बॉम्बे प्रोबेशन अ‍ॅक्ट सेक्शन २५५ अंतर्गत तीन वर्षांची सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा न्या. संतोष व्ही. पवार यांनी ठोठावली.

ठळक मुद्देअवैध दारू बाळगण्याच्या खटल्यामध्ये पुणे विभागात झालेली ही पहिलीच शिक्षाउत्तर सोलापूर तालुक्यातील केगाव येथे गोवा राज्यातील विदेशी मद्याचा साठा उत्पादन शुल्क अधिकाºयांनी जप्त केला होता. यामध्ये ३१० मद्याचे बॉक्स, २ आयशर, २ पिकअप व्हॅन, एक स्कॉर्पिओ, एक इनोव्हा असा एकूण ६२ लाख ६१ हजार ७२१ रुपयांचा मद्यसाठा जप्त केला होता

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २२ : गोवा येथील विदेशी मद्याचा साठा बेकायदेशीरपणे सोलापूर जिल्ह्यातून कर्नाटक राज्यात विक्रीस नेणाºया तीन आरोपींना दारूबंदी न्यायालयाने कलम ६५ इ, ए बॉम्बे प्रोबेशन अ‍ॅक्ट सेक्शन २५५ अंतर्गत तीन वर्षांची सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा न्या. संतोष व्ही. पवार यांनी ठोठावली. अवैध दारू बाळगण्याच्या खटल्यामध्ये पुणे विभागात झालेली ही पहिलीच शिक्षा असून महाराष्टÑातील केवळ तिसरी शिक्षा आहे.२६ जुलै २०१७ रोजी पहाटे ३.१५ वाजता उत्तर सोलापूर तालुक्यातील केगाव येथे गोवा राज्यातील विदेशी मद्याचा साठा उत्पादन शुल्क अधिकाºयांनी जप्त केला होता. यामध्ये ३१० मद्याचे बॉक्स, २ आयशर, २ पिकअप व्हॅन, एक स्कॉर्पिओ, एक इनोव्हा असा एकूण ६२ लाख ६१ हजार ७२१ रुपयांचा मद्यसाठा जप्त केला होता. या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यापैकी सोमनाथ तुकाराम भोसले (वय ३२, रा. खवणी, ता. मोहोळ), समाधान तुकाराम भोसले (वय २९, रा. खवणी, ता. मोहोळ), अविनाश दिगंबर डोंगरे (वय २३, रा. आढेगाव, ता. मोहोळ) या तिघांना तीन वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे तर पोपट मनोहर मुळे (वय ३२, रा. खंडाळी, ता. मोहोळ), अवधूत रामचंद्र माळी (वय २४, रा. शेजबाभूळगाव) या दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खटल्यात सरकारतर्फे अ‍ॅड. नितीन नरवाडकर व विद्या सचिन बनसोडे यांनी काम पाहिले. आरोपीचे वकील म्हणून अ‍ॅड. महेश जगताप, धावणे, सूर्यवंशी यांनी काम पाहिले.-------------------------पाच महिन्यात निकालच्जुलैमध्ये जप्त केलेल्या मद्यसाठ्यातील आरोपींविरुद्ध २१ नोव्हेंबर २०१७ रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. पाच महिन्यानंतर म्हणजे २१ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. पंच लक्ष्मण डोलारे यांनी सुरुवातीपासून दिलेली साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.----------------यांनी केला तपासच्या खटल्यात पुणे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, सोलापूरचे अधीक्षक रवींद्र आवळे, निरीक्षक समीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी दुय्यम निरीक्षक प्रशांत निकाळजे, राहुल बांगर, मुकेश चव्हाण, गजानन होळकर, मलंग तांबोळी, विजय शेळके, रशीद शेख, संजय नवले, गजानन ढब्बे, शोएब बेगमपुरे, चेतन व्हनगुंटी.-------------बनावट आणि बेकायदेशीर मद्यविक्री करणाºयाविरुद्ध अनेक खटले दाखल होतात, परंतु शिक्षा होत नाही. तपास अधिकारी आणि त्यांच्या टीमने योग्य दिशेने तपास केल्यामुळे ही शिक्षा झाली. यामुळे असे कृष्णकृत्य करणाºयांवर जरब बसणार आहे.- रवींद्र आवळे,अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर.----------------------केवळ दोनवेळा शिक्षाबेकायदेशीरपणे मद्य विक्री करणाºया आरोपींना यापूर्वी महाराष्टÑात केवळ दोन खटल्यात शिक्षा झालेली आहे. विदर्भातील चिमूर आणि ठाणे जिल्ह्यातील एका प्रकरणात ही शिक्षा झाली आहे. बुधवारी सोलापूर दारूबंदी न्यायालयाने ठोठावलेली ही तिसरी शिक्षा आहे.जप्त वाहने शासन जमा करण्याचे आदेशया प्रकरणात एकूण पाच वाहने उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाºयांनी जप्त केली होती. यापैकी एम.एच. १३ एक्स २००१, एम.एच. १३ सीजे ९०२२ ही दोन आयशर वाहने शासन जमा करण्याचे आदेशही दारूबंदी न्यायालयाने दिले.

टॅग्स :Solapurसोलापूर