शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत चोरी करणाºया आरोपीस तीन वर्षे कारावास, मंगळसूत्र चोरल्याचा आरोप, लोहमार्ग न्यायालयाचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 09:10 IST

हैदराबाद-मुंबई रेल्वेत प्रवास करणाºया महिलेचे मंगळसूत्र चोरल्याप्रकरणी आरोपी सचिन विलास गायकवाड ( वय ३४, रा. रामवाडी, सोलापूर) यास न्यायदंडाधिकारी ओ. एस. पाटील यांनी ३ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देपोलीस हणमंत खताळ यांचा पुरावा ग्राह्य मानून सोलापूर दौºयावर असलेले न्यायदंडाधिकारी ओ. एस. पाटील यांनी आरोपीस ३ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावलीयामध्ये सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. अमर डोके यांनी व त्यांना पैरवी शेख व राऊत यांनी मदत केली. आरोपीतर्फे अ‍ॅड. पी. एम. लियाकत यांनी काम पाहिले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २२ : हैदराबाद-मुंबई रेल्वेत प्रवास करणाºया महिलेचे मंगळसूत्र चोरल्याप्रकरणी आरोपी सचिन विलास गायकवाड ( वय ३४, रा. रामवाडी, सोलापूर) यास न्यायदंडाधिकारी ओ. एस. पाटील यांनी ३ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. लोहमार्ग न्यायालयात आज (बुधवारी) या फौजदारी खटल्याची सुनावणी झाली.या खटल्यातील फिर्यादी दामर कोंडा मुरली कृष्णा (रा. शांतीनगर पॅलेस, सुभेदारी अनय कोंडा, आंध्रप्रदेश) या ६ जुलै २००७ रोजी रात्री ८.४० वाजता हैदराबाद येथून पुण्याला येण्यासाठी हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेस या रेल्वेच्या एस २ या डब्यातून आसन क्र. २ वर  बसल्या होत्या. गाडी सोलापूर-कुर्डूवाडी दरम्यान सिग्नलला थांबली होती. दरम्यान, आरोपीने खिडकीत हात घालून फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओढू लागला. त्यावेळी फिर्यादी जागी झाल्याने तिने मंगळसूत्र पकडले. त्यावेळी  आरोपीशी झालेल्या झटापटीत आरोपीने फिर्यादीचे अर्धे मंगळसूत्र तोडून चोरुन नेले. चोरलेले मंगळसूत्र ३० ग्रॅम वजनाचे होते. फिर्यादीच्या हातात १० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र राहिले. झाल्या प्रकाराची फिर्यादीने कुर्डूवाडी लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर तपास अधिकारी जफरे यांनी तपास करुन आरोपी सचिन विलास गायकवाड (वय ३४, रा. रामवाडी, जि. सोलापूर) यास अटक करुन त्याच्याविरुद्ध लोहमार्ग न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.यामध्ये फिर्यादी, साक्षीदार पंच अशोक रायपुरे, पोलीस हणमंत खताळ यांचा पुरावा ग्राह्य मानून सोलापूर दौºयावर असलेले न्यायदंडाधिकारी ओ. एस. पाटील यांनी आज (बुधवारी) आरोपीस ३ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. यामध्ये सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. अमर डोके यांनी व त्यांना पैरवी शेख व राऊत यांनी मदत केली. आरोपीतर्फे अ‍ॅड. पी. एम. लियाकत यांनी काम पाहिले.

टॅग्स :Solapurसोलापूर