शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

चांद्रयान मोहिमेत सोलापुरातील तिघांनी पाडली छाप; कुणी बनविले सेमीकंडक्टर, कुणी पुरविल्या कॉपर ट्यूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2023 18:09 IST

चांद्रयान - 3 मोहिमेमुळे भारताची मान जगभरात उंचावली आहे.

शीतलकुमार कांबळेसोलापूर : चांद्रयान - 3 मोहिमेमुळे भारताची मान जगभरात उंचावली आहे. या मोहिमेत सोलापूर जिल्ह्यातील एक नव्हे तर तीघांनी आपल्या कामाची छाप पाडली आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी ही एक अभिमानाची बाब असून तरुणांना अभियांत्रिकी व खलोगशास्त्रात करिअर करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणार आहे. चांद्रयान मोहिमेत चीप डिझाईन हा एक महत्वाचा भाग आहे. या चीप डिझाईनच्या टिमला सोलापुरातील तरुण उदय खांबेटे यांच्या टिमने लीड केले. त्यांच्या टिमने एससीएल फॅब्रिकेटेड विक्रम प्रोसेसर याच्या लाँच वेहिकल नेवीगेशन व कॅमेरा कॉनफीगरेटरचे काम केले आहे. यामुळे विक्रम लँडर इमेज कॅमेरा त्याचे काम चांगल्या पद्धतीने करु शकत आहे. उदय खांबेटे यांचे शालेय शिक्षण हे शहरातील हरीभाई देवकरण विद्यालयातून तर पदवीचे शिक्षण वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून झाले.

आयआयटीमधून शिक्षण झाल्यानंतर मल्लिकार्जुन पाटील हे इस्त्रोच्या सेवेत रुजू झाले. इस्रोमध्ये त्यांच्या सेवेचे हे 32 वे वर्ष आहे. सध्या इस्रोच्या केरळमधील विक्रम साराभाई स्पेस सेंटर तिरुअनंतपुरम येथे शास्त्रज्ञ, तसेच सह संचालक या पदावर काम करीत आहेत. इस्रोमध्ये इंजिनीयर म्हणून सुरु झालेला प्रवास सह संचालक पदापर्यंत सुरुच आहे. चांद्रयान मोहिमेत सिल्वर व कॉपरपासून तयार करण्यात आलेल्या ट्यूबचा वापर करण्यात आला आहे. ही ट्यूब सोलापूर जिल्ह्यातील शेखर भोसले यांच्या टीमने तयार केली आहे. भोसले हे मेकॅनिकल इंजिनिअर असून बुलढाणा येथील खामगावमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनविण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. चांद्रयान मोहिमेत त्यांनी 50 ट्यूब तयार करुन इस्त्रोला दिल्या आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूर