शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

हजारो बांधव सोलापुरात एकत्र येणार; सकल हिंदू समाजातर्फे रविवारी विराट हिंदू गर्जना मोर्चा

By appasaheb.patil | Updated: February 22, 2023 17:05 IST

याबाबत श्री. गोरांटला म्हणाले, देशात लव्ह जिहादची समस्या हिंदूंना मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. तसेच अनेक गावांमध्ये हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले जात आहे.

सोलापूर : सकल हिंदू समाजातर्फे रविवारी (दि. २६) लव्ह जिहाद विरोधी, धर्मांतरण विरोधी कायदा व्हावा, गोहत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा बलिदान दिवस (फाल्गुन अमावस्या) धर्मवीर दिन म्हणून शासनाकडून घोषित व्हावा या प्रमुख चार मागण्यांकरिता विराट हिंदू गर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी दुपारी ३ वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातून या मोर्चास प्रारंभ होणार आहे, अशी माहिती सकल हिंदू समाजाचे समन्वयक अंबादास गोरंटला यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत श्री. गोरांटला म्हणाले, देशात लव्ह जिहादची समस्या हिंदूंना मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. तसेच अनेक गावांमध्ये हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले जात आहे. गोहत्या बंदीचा कायदा लागू आहे. मात्र त्याची कठोर अंमलबजावणी होत नसल्यामुळे दररोज हजारो गाई कापल्या जात आहेत. त्यामुळे या सर्व समस्यांवर कठोर उपाय योजना कायद्याद्वारे करावी आणि धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराजांचा बलिदान दिवस म्हणजेच फाल्गुन अमावस्या हा दिवस 'धर्मवीर दिन' म्हणून सरकारने घोषित करावा या मागणीकरिता हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

रविवारी दुपारी ३ वाजता हा मोर्चा छत्रपति श्री शिवाजी महाराज चौकातून प्रारंभ होईल. येथून बाळीवेस, टिळक चौक, मधला मारुती, माणिक चौक, श्री सोन्या मारुती, श्री दत्त मंदिर, सावरकर मैदान, सुभाष चौक, सरस्वती चौकमार्गे हिंदू गर्जना मोर्चा चार हुतात्मा पुतळा येथे विसर्जित होणार आहे. या मोर्चाच्या समारोपाला प्रखर हिंदुत्ववादी नेते धनंजय देसाई यांचे मार्गदर्शन होणार आहे.

या मोर्चासाठी हिंदू बांधवांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. सोलापुरातील विविध संस्था, संघटना, मंडळे, ज्ञाती संस्था, सामाजिक संस्था यांनी या मोर्चाच्या तयारीमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे, असे  गोरांटला यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस सकल हिंदू समाजाचे समन्वयक संतोष कुलकर्णी, रंगनाथ बंकापूर, रवी गोणे, संजय जमादार, श्रीधर अरगोंडा, प्रशांत हलसंगी, प्रमोद येलगेटी, अश्विनी चव्हाण, जयदेव सुरवसे, नागेश बंडी आदी उपस्थित होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरLove Jihadलव्ह जिहादHinduहिंदू