शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपाचा तिसरा गट उदयाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 13:06 IST

दोन देशमुखांचा संघर्षात मोहिते-पाटील गटाला आता थेट मुख्यमंत्र्यांकडून मिळाले पाठबळ

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपाचा तिसरा गट उदयाला आला

सोलापूर : रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपाचा तिसरा गट उदयाला आला आहे़ सध्या पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे दोन गट जिल्ह्यात कार्यरत आहेत़ गटातटाच्या राजकारणात या नवीन गटाची भर पडल्याने तिसरा पर्याय कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला गटबाजी तशी नवी नाही़ एकसंध काँग्रेसमध्ये जिल्ह्यात वसंतदादा गट आणि पवार गट पूर्वीपासून होते़ वसंत दादा गटाचे नेतृत्व सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्याकडे तर नामदेवराव जगताप पवार गटाचे म्हणून ओळखले जात होते़ जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँकेत दोन्ही गटात नेहमीच शह-काटशहाचे राजकारण चालत असे कालांतराने नामदेवराव जगताप गटाची धुरा सुशीलकुमार शिंदे यांना सांभाळावी लागली़ सोलापूर महानगरपालिकेवर याच गटाचा प्रभाव कायम राहिला़ मोहिते-पाटील गटाने पंढरपूर विभागातील ग्रामीण भाग आपल्या वर्चस्वाखाली ठेवला़ मोहिते-पाटील यांनी शहराच्या राजकारणात तर सुशीलकुमार शिंदे यांनी ग्रामीण भागात हस्तक्षेप करायचा नाही, हा जणू अलिखित करारच होता़ त्यामुळेच दोन्ही नेत्यात संघर्षाचे प्रसंग आले.

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर विजयसिंह मोहिते-पाटील यांचा गट वेगळा झाला़ काँग्रेसचे नेतृत्व सुशीलकुमार शिंदे यांना करावे लागले़ राष्ट्रवादीत नवी पिढी जसजशी उदयाला आली तसतसे या पक्षात नवे सुभेदार निर्माण झाले़ त्यांच्यात मोहिते-पाटील गट, बबनराव शिंदे गट निर्माण झाले़ थेट अजित पवारांशी संपर्कात असलेल्या शिंदे गटाने मोहिते-पाटील यांच्यावर कुरघोडी करण्याची संधी सोडली नाही़   सध्या जिल्ह्यात पालकमंत्री आणि सहकारमंत्र्यांचे भाजपांतर्गत स्वतंत्र गट आहेत़ विधानपरिषद, जिल्हा परिषद, जिल्हा बँक आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दोन देशमुखातील गटबाजी चव्हाट्यावर आली़ जि़ प़ अध्यक्ष संजय शिंदे, बार्शीचे राजेंद्र राऊत, आ़ प्रशांत परिचारक, उत्तम जानकर, आनंद तानवडे ही मंडळी पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करतात़ सहकारमंत्र्यांनी अल्पावधीत राजेंद्र मिरगणे, राजकुमार पाटील, संजय कोकाटे, सचिन कल्याणशेट्टी, शहाजी पवार यांना शक्ती देऊन उभे केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचा जुना दोस्ताना आहे़ पक्ष प्रवेशापूर्वी त्यांनी स्थानिकांना डावलून थेट मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी संपर्क वाढवला़ मुख्यमंत्र्यांनी प्रवेशावेळी आपण आता थेट मोहिते-पाटलांशी बोलू, असे सांगून त्यांना बळ दिले आहे़  यापुढच्या काळात मोहिते-पाटलांचा तिसरा गट जिल्ह्यात सक्रिय होणार हे स्पष्ट झाले़ 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटीलSubhash Deshmukhसुभाष देशमुखVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुख