शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

पंढरीवर तिसरा डोळा मंदिर परिसर, विविध भागात बसविले १०० सीसीटीव्ही कॅमेरे

By admin | Updated: June 30, 2017 12:42 IST

आॅनलाइन लोकमत सोलापूर

आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर : प्रभू पुजारीश्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिसर, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, पत्राशेडपर्यंतची दर्शन रांग, चंद्रभागा वाळवंट आदी ठिकाणांतील छोट्या-मोठ्या घटना, घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने एकूण १०० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ यासाठी मंदिरात आणि संत तुकाराम भवन येथे असे दोन नियंत्रण कक्ष (कंट्रोल रुम) तयार करण्यात आले आहेत़ सीसीटीव्हीरुपी तिसऱ्या डोळ्याचा वॉच संपूर्ण पंढरीवर असेल़आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर शहरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे़ येणाऱ्या सर्व भाविकांना शिस्तीत दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समितीने संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप आणि तेथून स्कायवॉक, दर्शन रांगेची सोय केली आहे़ शिवाय मंदिर समितीचे कायमस्वरुपी चार पत्राशेड असून, आता यात्रा कालावधीसाठी तात्पुरते १० पत्राशेड उभारण्यात आले आहेत़ या ठिकाणी दर्शन रांगेत होणारी घुसखोरी, भाविक भोवळ येऊन पडणे, धक्काबुक्की, चोरी अशा घटना, घडामोडींवर सीसीटीव्हीची नजर असेल़ दर्शन रांगेत कोठे असा प्रकार होत असल्याचे लक्षात येताच नियंत्रण कक्षातून वॉकीटॉकीद्वारे संवाद साधून यावर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी सीसीटीव्हीची मदत होणार आहे़मंदिर समितीने एकूण १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असले तरी त्यातील ६५ हे कायमस्वरुपी आहेत तर ३५ तात्पुरत्या स्वरुपाचे आहेत़ ------------------------------फोकल लेंथचे कॅमेरेविशेष म्हणजे कार्तिकी वारीच्या वेळीच चंद्रभागा वाळवंटातील घडामोडी टिपण्यासाठी महाद्वार घाटावरील हायमास्ट दिव्यावर कायमस्वरूपी ‘फोकल लेंथ’चे चार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ या कॅमेऱ्यांमुळे चंद्रभागा पात्रातील घटना, घडामोडींवर लक्ष ठेण्यास मदत होणार आहे़