शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

जिल्ह्यात ८ लाख ५९ हजार कुटुंबांची संख्या

By admin | Updated: July 11, 2014 01:38 IST

जागतिक लोकसंख्या दिन : वृद्धीदर १२.१० टक्के, ९३ हजार महिला कुुटुंबप्रमुख, प्रतिहजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण ९१६

 सोलापूर : सन २०११ च्या जनगणनेनुसार सोलापूर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ४३ लाख १७ हजार ७५६ इतकी असून, एकूण कुटुंबांची संख्या ८ लाख ५९ हजार आहे. जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण ७७.७२ टक्के इतके आहे. लोकसंख्येचा दशवार्षिक वृद्धीदर १२.१० टक्के इतका आहे. तर लोकसंख्येची चौरस किलोमीटर घनता २९० इतकी आहे. जिल्ह्यात प्रतिहजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण ९१६ आहे तर शून्य ते सहा वयोगटातील प्रतिहजार पुरुषांमागे ८७२ इतके स्त्रियांचे प्रमाण आहे.जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्येचा तालुका म्हणून उत्तर सोलापूर ओळखला जातो. या तालुक्याची संख्या १० लाख ५७ हजार ३५२ आहे़ तसेच आरक्षणाच्या दृष्टिकोनातून पाहिले असता जिल्ह्यामध्ये ६ लाख ४९ हजार ७४५ मागासवर्गीय नागरिक आहेत़ ही सर्व आकडेवारी सर्वप्रकारच्या निवडणुकांवर परिणाम करणारी आहे़ सोलापूर जिल्ह्यातील एकूण ४३,१७,७५६ लोकसंख्येत पुरुष २२,२७,८५२ तर महिला २०,८९,९०४ इतक्या आहेत. जिल्ह्यातील एकूण कुटुंबांची संख्या ८ लाख ५९ हजार आहेत. विशेष म्हणजे महिला कुटुंबप्रमुखांची संख्या ९३ हजार इतकी आहे. २००१ च्या जनगणनेच्या तुलनेत सोलापूर शहराच्या लोकसंख्येत केवळ एक लाखांची भर पडली आहे. शहराचा पसारा वाढला मात्र लोकसंख्या वाढली नाही हे विशेष. २००१ ला सोलापूरची लोकसंख्या साडेआठ लाखांच्या आसपास होती ती २००१ ला ९ लाख ५१ हजार ११८ पर्यंत गेली.@--------------------------------------आपल्या सोलापूर जिल्ह्यात...४असा आहे पिण्याच्या पाण्याचा स्रोतशहर आणि जिल्ह्यात घरात नळाचे पाणी वापरणाऱ्या कुटुंबांची संख्या ५७.० टक्के इतकी आहे. विहिरीचे पाणी वापरणारी कुटुंबे १७.७ टक्के इतकी आहेत. हातपंपाचे पाणी वापरणारे १४.३ टक्के आहेत. कुपनलिकेचे पाणी वापणारे ८.१ टक्के, झऱ्याचे पाणी वापरणारे ०.१ टक्का, नदी-कालव्याचे पाणी वापरणारे ०.९ टक्के, टाकी, तळे व तलावाचे पाणी वापरणारे ०.६ टक्के, इतर स्रोत असणारी कुटुंबे १.२ टक्के आहेत. घरात नळ असणाऱ्या कुटुंबाचे प्रमाण ४९.८ टक्के आहे. निवासाजवळ नळ असणारी कुटुंबे ३५.६ टक्के आहेत तर निवासापासून लांब नळ असणारी कुटुंबे १४.६ टक्के इतकी आहेत. असे असूनही सोलापूर जिल्हा दरवर्षी उन्हाळ्यात नेहमीच तहानलेलाच असतो.४स्नानगृह, सांडपाणी व स्वयंपाक घराची उपलब्धताजिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी ५०.९ टक्के कुटुंबांकडे बंदिस्त स्नानगृह आहे. छत नसलेले ३०.४ तर स्नानगृहेच नसलेल्या कुटुंबांची संख्या १८.७ टक्के इतकी आहे. सांडपाण्याची बंदिस्त सुुविधा असणारी कुटुंबे २१.१ टक्के आहेत. उघड्यावर सांडपाणी सोडणारे कुटुंबे ३१.५ टक्के आहेत. सांडपाण्याची कुठलीच सुविधा नसलेल्या कुटुंबाचे प्रमाण ४७.४ टक्के आहे. स्वयंपाक घराची स्वतंत्र व्यवस्था नसलेली कुटुंबे २६.६ टक्के इतकी आहेत. उघड्यावर स्वयंपाक करणारी कुटुंबे ८.३ टक्के आहेत तर स्वयंपाक न करणाऱ्या कुटुंबांची संख्या ०.६ टक्के इतकी आहे.४शौचालयांची उपलब्धता व सुविधेचा प्रकारसोलापूर जिल्ह्यातील ४१.३ टक्के कुटुंबांकडे राहत्या जागेत शौचालयांची उपलब्धता आहे. फ्लश शौचालये असणारी कुुटुंबे २७.० टक्के इतकी आहेत. शौच खड्डे असणारी कुटुंबे १३.५ टक्के आहेत. इतर प्रकारची शौचालये असणारी कुटुंबे ०.८ टक्के आहेत. सार्वजनिक शौचालयांचा वापर करणारी कुटुंबे १७.६ टक्के आहेत तर उघड्यावर शौच करणाऱ्या कुटुंबांची संख्या ४८.३ टक्के इतकी आहे.४अशी आहे कुटुंबांची मालमत्ता२०११ च्या जनगणनेनुसार सोलापूर जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात १९.१ टक्के लोकांकडे रेडिओ आहे. दूरदर्शन संच असणाऱ्यांची संख्या ४३.८ टक्के इतकी आहे. इंटरनेट वापरणारे केवळ १.८ टक्के लोक आहेत. दूरध्वनी ४.१ टक्के लोकांकडे आहे तर मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या ५८.३ टक्के आहे. सायकल वापरणारे लोक ४८.८ टक्के तर दुचाकी मोटरसायकल वापरणारे २६.७ टक्के लोक आहेत. जिल्ह्यात केवळ ३.३ टक्के लोक चारचाकी वाहन वापरतात.४स्वयंपाकासाठी इंधन वापरजिल्ह्यातील ५९.१ टक्के लोक स्वयंपाकासाठी जळाऊ लाकडांचा वापर करतात. पीक अवशेष वापरणारे २.९ टक्के लोक आहेत. गोवऱ्या वापरणाऱ्यांची संख्या १.२ टक्के आहे. कोळसा, वीज, लाकडी कोळसा वापरणारे ०.२ टक्के कुटुंबे आहेत. रॉकेल वापरणारे ६.६ टक्के तर एलपीजी गॅस वापरणारे कुटुंबे २८.९ टक्के आहेत. स्वयंपाकासाठी केवळ वीज वापरणारे कुटुंबे ०.१ टक्का आहेत. बायोगॅस वापरणारे ०.४ टक्के कुुटुंबे आहेत. इतरांमध्ये ०.१ टक्का लोक आहेत. विशेष म्हणजे स्वयंपाक न करणारे अर्थात बाहेर खाणाऱ्या कुटुंबांची संख्या ०.६ टक्के आहे.४प्रकाशाचा स्रोत असणारी कुटुंबेजिल्ह्यात प्रकाशाचा स्रोत असणारी वर्गवारीनुसार कुटुंबे पुढीलप्रमाणे आहेत. विजेचा वापर करणारी ६९.३ टक्के, रॉकेलचे दिवे वापरणारे २८.८ टक्के, सौरऊर्जेचा वापर करणारी ०.१ टक्का, इतर साधनांचा वापर करणारे ०.५ टक्के तर प्रकाशाची सुविधाच नसणारी कुटुंबे १.३ टक्के इतकी आहेत.--------------------------१४ लाख नागरिक निरक्षर सोलापूर जिल्ह्यात एकूण लोकसंख्येपैकी २९ लाख १० हजार ६७६ नागरिक साक्षर असल्याचे आढळून आले आहे़ साक्षरतेमध्येही उत्तर सोलापूर तालुका आघाडीवर असून ७ लाख ६६,८१९ नागरिक साक्षर निदर्शनास येतात़ साक्षरतेचे सर्वाधिक कमी प्रमाण हे दक्षिण सोलापुरात (१ लाख ६५,९८०) आहे़ तर सोलापूर जिल्ह्यात तब्बल १४ लाख ७ हजार ८० निरक्षर आहेत. साक्षरतेच्या गप्पा मारणाऱ्या जिल्ह्याला इतकी निरक्षर संख्या न शोभणारी आहे.