जुनोनी येथील सिद्धेश्वर शिवाजी श्रीराम, अमर बापू श्रीराम, संतोष भीमराव आलदर या तिघांनी अमृत पाटील यांचे चुलते विलास नाथा पाटील यांच्या शेतातील बोअरमधील ७.५ एचपीची मोटार, केबलसह १० फुटी ७० पीव्हीसी पाईप बाहेर काढून शेतातच ठेवले होते. त्यानंतर तिघे जण घरी जेवण करण्यासाठी गेले. दुसऱ्या दिवशी अमृत पाटील व सिद्धेश्वर श्रीराम हे शेतात गेले असता तेथे मोटार, केबल, पाईप हे साहित्य दिसून आले नाही. त्यांनी कामगार संतोष आलदर यास साहित्याविषयी विचारणा केली असता त्याने मी तेथे ठेवले होते म्हणून सांगितले. यानंतर अमृत पाटील यांनी वडिलांकडे विचारपूस केली असता त्यांनीही माहीत नसल्याचे सांगितले. याबाबत अमृत नारायण पाटील यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
पाईपसह बोअरमधील विद्युत मोटारीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:21 IST