शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घाटातील डोंगर फोडण्याच्या कामाला दिली गती, शिंगणापूर घाट २२ ऑगस्टअखेर बंदच राहणार

By काशिनाथ वाघमारे | Updated: August 5, 2023 17:45 IST

सातारा-सोलापूर जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख घाटमार्ग महिनाभर बंद आहे. वाहनधारक, भाविक, स्थानिक प्रवाशी त्रस्त आहेत.

सोलापूर : रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे दहिवडी-नातेपुते मार्गावर शिंगणापूर घाटात वाहतूक २४ जुलैपासून बंद आहे. सध्या घाटातील डोंगर फोडण्याचे काम प्रगतीपथावर असून २२ ऑगस्टअखेर शिंगणापूर घाटरस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती अकलूज बांधकाम विभागाने दिली.

सातारा-सोलापूर जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख घाटमार्ग महिनाभर बंद आहे. वाहनधारक, भाविक, स्थानिक प्रवाशी त्रस्त आहेत. अहमदनगर-डाळज-कराड राज्यमार्ग अंतर्गत नातेपुते मार्गावर शिंगणापूर घाटातील रस्ता रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सोलापूर जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच २४ जुलै ते ७ ऑगस्ट अखेर घाटातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यास परवानगी दिली आहे. सध्या डोंगर फोडण्याचे ५० ते ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यातच डोंगर फोडताना दरडी कोसळून रस्त्याचे संरक्षक कठडे व भिंती ढासळल्या आहेत. दरडीचे मोठेमोठे दगड रस्त्यावर कोसळताहेत. ते हटविण्याचे कामही सुरू आहे. मात्र नैसर्गिक अडचणी, कड्याची उंची यामुळे कामात अडथळे येत आहेत.पंधरा दिवसांची मागितली मदत

* प्रशासनाने परवानगी दिलेल्या मुदतीत काम पूर्ण होत नसल्याने ठेकेदार कंपनीने उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी बांधकाम विभागाकडे आणखी १५ दिवसांची मुदतवाढ मागितली आहे.* अकलूज बांधकाम विभागाने ८ ऑगस्ट ते २२ ऑगस्टअखेर घाटातील वाहतूक बंद ठेवून वाहतूक पूर्वीप्रमाणे पर्यायी मार्गाने वळविण्यासंदर्भात सोलापूर जिल्हाधिकारी यांचेकडे परवानगी मागितली आहे.* त्यामुळे शिंगणापूर घाटरस्ता २२ ऑगस्टअखेर वाहतुकीस बंद राहणार असल्याचे अकलूज बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनीता पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूर