शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अबब... पपईचं वजन चक्क पाच किलो! सोलापुरातील शिक्षकांच्या बागेतील फळ

By काशिनाथ वाघमारे | Updated: May 13, 2023 16:37 IST

सहा ते नऊ महिन्यात पपईचे रोप सहा फूट उंचीचे झाले असून त्याला फळधारणाही झाली.

सोलापूर : साधारणत: पपईचे वजन आजपर्यंत दोन किलो ते अडीच किलोपर्यंतचे पाहिले असाल. मात्र चक्क पपईचे वजन पाच किलो असल्याचे दुर्मीळ उदाहरण सोलापुरात होटगी रोडवरील भारत नगरात एका शिक्षकाच्या बागेत पाहायला मिळाले आहे.ग्रामीण भागातून नोकरीनिमित्त होटगी रोडवर स्थायिक झालेले शिक्षक हणमंत बिज्जरगी यांच्या परसबागेतील हा अनुभव आहे. 

बिज्जरगी हे ग्रामीण भागातून आलेले असून त्यांना शेतीचाही अनुभव आहे. शहरात अनेक वर्षांपासून राहात असलो तरी घराच्या आवारात हिरवाई फुलवणं हे कोणालाही स्वस्थ बसू देत नाही. त्यांच्या पत्नीने आवारात केळीची चार रोपं लावली. त्या रोपाचं संगोपन करीत असताना त्याच्याच बाजूला खडकाळात नकळतपणे एक पपईचे झाड उगवले. त्याला त्यांनी केळीच्या रोपाबरोबर वाढवलं.

सहा ते नऊ महिन्यात पपईचे रोप सहा फूट उंचीचे झाले असून त्याला फळधारणाही झाली. या काळात पाच पपई फळं लागले आणि त्यापैकी एक फळ चक्क पाच किलो ८०० ग्रॅम वजनाचे असल्याची नोंद झाली आहे. बाकीची फळे ही दोन-अडीच किलो वजनातील आहेत. मात्र एक फळ चक्क दुपटीच्या वजनाएवढे लगडल्याने अनेकांना नवल वाटू लागले आहे. मात्र कृषिप्रधान बिज्जरगी कुटुंब मात्र यामागील शास्त्रीय कारणांचा शोध घेत आहे.पपईचे वजन दोन-अडीच किलोपर्यंत असू शकते. मात्र दुप्पटीच्या वजनाइतके फळ हे दुर्मीळ आणि ॲबनॉर्मल ठरतं. अशा फळापासून काही नुकसान नाही. याकडे जेनेटिक चेंजेस म्हणून पाहिले जाते. मनुष्यात, जनावरातही असे बदल अलीकडे पहायला मिळत आहे. तसाच एखादा बदल पाहतोय.- बाळासाहेब शिंदे, कृषितज्ज्ञ

टॅग्स :Solapurसोलापूर