शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरच्या ‘मातीचे आकाशकंदील’ उजळविणार आसमंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 06:15 IST

आंध्र, कर्नाटक, तेलंगणामध्ये मागणी वाढली : रंगसंगती, नक्षीकामाला पसंती

लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : एकीकडे परराज्यातील उत्पादनाची सोलापूरच्या मार्केटमध्ये रेलचेल असताना येथे पर्यावरणपूरक  असलेल्या मातीपासून बनविण्यात येणाऱ्या आकाशकंदिलांची परराज्यातील ग्राहकांना भुरळ पडली आहे. पुण्या-मुंबईसह शेजारच्या आंध्र, कर्नाटक, तेलंगणामध्येही मागणी वाढली आहे. सोलापुरी चादरीप्रमाणे स्वतःची नवी ओळख इथले कारागीर निर्माण करीत आहेत.

येथील मातीपासून तयार केले जाणारे आकाशदिवे त्यावरील  सुंदर नक्षीकाम, वैविध्यपूर्ण आकारातील उपलब्धता, मनमोहक रंगसंगती, आतील बाजूस चमचमणारे  बहुरंगी एलईडी दिवे, सहज टांगून ठेवता येईल अशी रचना, जपली जाणारी पर्यावरणपूरकता यामुळे स्थानिक बाजारपेठेसह परराज्यातील ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत.

सध्या राज्यातील पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील मराठवाडा, कोल्हापूर, सांगली, सातारा  आणि शेजारच्या आंध्र, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांतून आकाशदिव्यांची मागणी वाढत आहे.  दीपावलीपूर्वी  दोन महिने अगोदर तयार करण्यात येणारे आकाशकंदील आता सहा महिने अगोदरच सुरू करावे लागत आहेत. येथील कुंभार समाजानेही कात टाकली असून, परंपरागत  फिरत्या  चाकांऐवजी यांत्रिक पद्धतीने उत्पादन सुरू केले आहे, असे विकास कुंभार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

परराज्यात सोलापुरी मातीचा ठसाशहरातल्या कारागिरांनी आकर्षक रंगसंगती सोबत आकारात विविधता आणत नवनिर्मिती केली. परप्रांतीयांच्या  उत्पादनाला शहरातून हद्दपार केले. सोलापूरच्या मातीच्या आकाशकंदिलाचे ब्रँड निर्माण करीत   परराज्यातही आपला ठसा उमटवला  आहे. 

असे तयार होतात आकाशकंदीलयेथील शेतातील काळ्या चिकणमातीत चिवटपणा येण्यासाठी कोल्हापुरी तांबडी माती, राजस्थानी पुफरा माती, फरशांची पावडरयुक्त माती ठरावीक प्रमाणात मिसळली जाते. मातीच्या गोळ्याला मशीनवर आकार दिल्यानंतर  ते कच्चे असतानाच त्यावर नक्षीकाम केले जाते. त्यानंतर भट्टीत भाजून ते अडकवण्यासाठी  लोखंडी तार बांधण्यात येते. रंगरंगोटी करून मण्यांची सजावट केली जाते आणि विक्रीसाठी सज्ज करण्यात येतात. त्याचे वजन २०० ते ६०० किलोग्रॅम इतके असते. आतील बाजूस एलईडी दिव्याची सोय असते. नारळ, गोलाकार, लंब गोलाकार, चौकोनी, षटकोनी आकारात तयार करण्यात येतात.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021