शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

मोठी बातमी! थकबाकीपोटी जप्त मालमत्ता महापालिकेच्या नावावर होणार

By appasaheb.patil | Updated: December 15, 2022 12:33 IST

अभय योजनेचा आज शेवटचा दिवस; वसुली व जप्तीची कारवाईचा वेग वाढला

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेकडून सध्या मालमत्ता कर थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. मागील सात दिवसात ६ कोटी ७२ लाख रकमेसाठी ९ थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. थकबाकीची रक्कम पूर्णपणे भरल्याशिवाय सील काढले जाणार नाही, थकबाकीची रक्कम न भरल्यास संबंधितांची प्रॉपर्टीज् महापालिकेच्या नावावर करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल, असा इशारा उपायुक्त विद्या पोळ यांनी दिला आहे.

महापालिकेच्या कर विभागाने पेठनिहाय, विभागनिहाय मोठ्या थकबाकीदारांची नावे काढली. त्यांच्यावर जप्तीची कारवाई सुरू आहे. मागील आठ दिवसात ७ कोटी ५० लाख रुपयांची वसुली केली आहेत. यात कारवाईसाठी गेल्यावर व काहींनी ऑनलाइन स्वरूपात जमा केलेली रक्कम आहे. आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या आदेशानुसार शहरातील मोठ्या थकबाकीदारावर जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. यासाठी कर संकलन विभागाने पाच पथके तैनात केली आहेत. कारवाईच्या भीतीने बहुतांश थकबाकीदार कर भरीत आहेत, मात्र काही बडे थकबाकीदार अद्यापही कर भरण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत असल्याने महापालिकेने आता थकबाकीदाराविरोधात कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला मोठ्या थकबाकीदाराविरोधात कारवाई सुरू केली, मात्र आता १५ डिसेंबर २०२२ नंतर सरसकट वसुली व जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचेही विद्या पोळ यांनी सांगितले.

अभय योजनेचा आज शेवटचा दिवस८० टक्के शास्ती माफ होणारी अभय योजनेला आयुक्तांनी मुदतवाढ दिली होती. मात्र त्याचा लाभ सोलापूरकरांनी घेतला नाही. दरम्यान, आज या अभय योजनेचा शेवटचा दिवस असून सोलापूरकरांनी थकीत मालमत्ता भरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन कर संकलन विभागाचे अधीक्षक गाडेकर यांनी केले आहे.