शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

'लोकमत'ची बातमी पोहोचली मुख्यमंत्र्यापर्यंत; हरणा नदी दुर्घटना प्रकरणी थेट जिल्हाधिकाऱ्यांना कॉल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2022 11:57 IST

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील एक तरूण हरणा नदीत वाहून गेला

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील हरणा नदीत वाहून गेलेत्या तरूणाच्या 'लोकमत' बातमीची दखल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सकाळी घेतली. त्यानंतर तत्काळ त्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना कॉल केला. दुर्घटनेविषयी माहिती जाणून घेऊन दोन  दिवसांत त्या पुलासंदर्भातील प्रस्तावाची फाईल मला मंत्रालयात पाठवा, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.  

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील एक तरूण हरणा नदीत वाहून गेला. दरम्यान, त्या तरूणाचा मृतदेह 36 तासानंतर सापडला. यापूर्वीही हरणा नदीत पाच ते सहा जण वाहून जाऊन मृत्यूमुखी पडले होते.

या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी शासकीय रूग्णालय व जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करून त्वरीत पुल करण्याची मागणी केली. या घटनेचे वृत्त बुधवारी 'लोकमत'च्या अंकात प्रसिध्द झाले. ही बातमी शिंदे यांचे विश्वासू सहकारी मनिष काळजे यांनी मुख्यमंत्र्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवली. ही बातमी वाचून मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना कॉल केला.

घटनेची विषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यानंतर 'संबंधित ग्रामस्थांना जावून समक्ष भेटा. त्याच्या अडीअडचणी जाणून घ्या. यापुढे आंदोलन करण्याची गरज नाही. दोन दिवसात पुलाचे काम सुरू करतो, असे सांगा अन् मला त्या पुलासंदर्भातील फाईल दोन दिवसाच्या आत मंत्रालयात पाठवून द्या,' असे आदेश दिले. यावेळी कॉन्फरन्स कॉलवर मनिष काळजे हेही लाईनवर होते.

 

 

टॅग्स :SolapurसोलापूरfloodपूरEknath Shindeएकनाथ शिंदेSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस