शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात वासरू मृत्युमुखी, दावं तोडून पळ काढल्याने गाय वाचली

By दिपक दुपारगुडे | Updated: August 10, 2023 13:03 IST

..पण बिबट्याच्या हल्ल्यानंतर दावं तोडून पळाल्याने वासराच्या जवळ असलेल्या गायीचा जीव वाचला.

सोलापूर : गेल्या सहा दिवसांपासून मांगी भागात बिबट्याचा वावर असून त्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला आहे. मात्र हा बिबट्या पिंजऱ्याकडे फिरकला नाही. त्याने एका वासरावर हल्ला करून फस्त केले. पण बिबट्याच्या हल्ल्यानंतर दावं तोडून पळाल्याने वासराच्या जवळ असलेल्या गायीचा जीव वाचला.

बिबट्याच्या वावरामुळे मांगी,पोथरे,कामोणे,खडकी या भागात पुन्हा घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने याची तत्काळ दखल घेऊन पुढील पावले उचलावीत, अशी मागणी मांगी सोसायटीचे चेअरमन सुजित बागल यांनी केली आहे. माजी आमदार बागल यांच्या शेताकडील बाजूस हा हल्ला झाला असल्याचे त्यांनी सांगितले. शेतात नागेश बागल यांची एक गाय व वासरू बांधले होते. मात्र गाय दावं तोडून पळून गेली तर लहान वासरू मात्र बिबट्याने हल्ला करून फस्त केले आहे. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली असून वनअधिकारी येथे दाखल झाले आहेत.बिबट्याच्या वावरामुळे रात्री ऐवजी दिवसा वीज द्याकरमाळा तालुक्यातील मांगी व पोथरे परिसरात बिबट्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पाऊसही लांबला आहे. त्यामुळे उसाला व इतर पिकांना पाणी देण्यासाठी लगबग सुरु आहे. त्यात बिबट्यामुळे भीती आहे. याकडे गांभीर्याने पाहून वीज वितरण कंपनीने मांगी, पोथरे, बिटरगाव श्री, आळजापूर भागात दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी पोथरे येथील शहजी झिंजाडे यांनी केली आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरleopardबिबट्या