शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरच्या राहुलची भरारी! प्रदूषणविराेधी उपकरण घेतले टाटांनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 06:02 IST

सोलापूरच्या दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात त्यानं एमसीव्हीसी ऑटोमोबाइल क्षेत्रात शिक्षण घेतलं.

लोकमत न्यूज नेटवर्क

सोलापूर : सोलापूरच्या युवा संशोधक इंजिनिअर राहुल बुऱ्हाणपुरे यांनी  चारचाकी वाहन क्षेत्रातील प्रदूषण कमी करण्यासाठी तयार केलेल्या उपकरणाचं पेटंट टाटा कंपनीने तब्बल साडेतेरा कोटी रुपयांनी विकत घेतलं आहे.

सोलापूरच्या दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात त्यानं एमसीव्हीसी ऑटोमोबाइल क्षेत्रात शिक्षण घेतलं. घरची अर्थिक स्थिती बेताची असल्याने राहुल यांनी दुचाकी, चारचाकी गाड्या दुरुस्तीचे काम केलं. हे करतानाच गाड्यांनी होणारे प्रदूषण कमी करण्याची कल्पना त्यांना सुचली. अनेक दिवस संशोधन करून  त्यांनी गाड्यांमधील प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी एक पार्ट बनवला.

 इंडियन स्टँडर्डच्या मानांकनानुसार हे उपकरण बनवले आहे. या उपकरणासाठी तीन ते चार कंपन्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला व या पेटंटची मागणी केली. परंतु त्यांनी पे पेटंट टाटा कंपनीला देण्याचा निर्णय घेतला.

सायलेन्सरजवळ बसविले जाते

चारचाकी गाड्यांची दूषित हवा बाहेर फेकल्या जाणाऱ्या ठिकाणी म्हणजेच सायलेन्सरजवळ हे उपकरण बसविले जाते. पीसीएम या सेन्सरद्वारे हा पार्ट नियंत्रित केला जातो. त्यामुळे सायलेन्सद्वारे बाहेर फेकली जाणारी ३० टक्के दूषित हवा रिसायकल होऊन पुन्हा इंजिनमध्ये सोडली जाते.

त्यामुळे प्रदूषणात सरासरी ३० टक्के घट तर होतेच; तसेच नायट्रोजन ऑक्साइडही ७० टक्के कमी करण्यात याची मदत होते. याशिवाय गाडीचे मायलेजही सुधारते.

नायट्रोजन ऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, हायड्रोकार्बन यासारखे घातक वायू चारचाकी वाहनांमधून उत्सर्जित होतात. त्यातील नायट्रोजन ऑक्साइड हा मानवी शरीरावर घातक असतो. टाटा मोटर्सकडून या नवीन पार्टचा वाहनांमध्ये पुढील वर्षापासून वापर होणार आहे.