शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सांगोला, वैराग, बार्शी येथील सीताफळांचा सोलापूरकरांना गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 14:19 IST

पाव किलोच्या फळाला मागणी : आवक वाढल्याने दर मात्र कमी

ठळक मुद्देगेल्या वर्षी एका क्रेटला १००० ते २००० रुपये दर होता. यावर्षी ५० टक्के कमी म्हणजे क्रेटला ५०० ते १००० रुपये दर सीताफळाच्या एका क्रेटला ५०० ते १००० रुपये दर आहे. गतवर्षी हा दर १००० रूपये ते २००० रूपये क्रेट इतका होतामध्यम आकाराची सीताफळं ५० ते ६० रुपये किलो आहेत. यावर्षी बाजारात मोठ्या प्रमाणात सीताफळांची आवक होत आहे

सोलापूर : सीताफळांचा हंगाम बहरला असून, फळबाजारात मोठ्या प्रमाणात सीताफळांची आवक पाहायला मिळत आहे. आवक वाढल्याने दरात देखील घसरण झाली आहे. या सीताफळांमध्ये मोठ्या आकाराची सीताफळे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. हे एक सीताफळ २५० ग्रॅम वजनाचे आहे. त्यामुळे एक किलोमध्ये केवळ तीन ते चार सीताफळं मिळत आहेत.

पावसाळ्यापासून सुरू होणारा सीताफळांचा हंगाम आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये संपतो. शेवटच्या काळात सीताफळांचा हंगाम मोठ्या प्रमाणात बहरतो. त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात सीताफळ पाहायला मिळतात. आताही बाजारात मोठ्या प्रमाणात सीताफळं येत आहेत. सीताफळांची आवक बहुतांश सांगोला, वैराग, बार्शी, मंगळवेढा या स्थानिक भागातून होत आहे. लहानापासून मोठ्या आकाराच्या सीताफळांचा यात समावेश आहे.

समाधानकारक पावसामुळे जास्त उत्पादित झालेल्या सीताफळांच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्यामुळे दर खाली आल्याने सीताफळप्रेमींना मोठ्या प्रमाणात सीताफळं खाता येणार आहेत. या वर्षीच्या समाधानकारक पावसामुळे फळे मोठी असून, गेल्या वर्षी एका क्रेटला १००० ते २००० रुपये दर होता. यावर्षी ५० टक्के कमी म्हणजे क्रेटला ५०० ते १००० रुपये दर मिळत असल्याचे शेतकºयांनी सांगितले़

उत्तम पावसाचा परिणाम...सीताफळाच्या एका क्रेटला ५०० ते १००० रुपये दर आहे. गतवर्षी हा दर १००० रूपये ते २००० रूपये क्रेट इतका होता.   मध्यम आकाराची सीताफळं ५० ते ६० रुपये किलो आहेत. यावर्षी बाजारात मोठ्या प्रमाणात सीताफळांची आवक होत आहे. चांगल्या पावसामुळे सीताफळं आकाराने मोठी आहेत, नागरिक देखील तेवढ्याच आवडीने खरेदी करत आहेत, अशी माहिती घाऊक व्यापारी अब्दुल रेहमान जमादार यांनी दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरMarketबाजारAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती