शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लक्षणे नसणाऱ्या संशयित काेरोना रूग्णांवर आता गावातच उपचार होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 12:44 IST

ग्रामीणमध्ये ७५ कोविड सेंटर : डॉक्टर असलेल्या दोन सरपंचांनी स्वीकारली जबाबदारी

सोलापूर : ग्रामीण भागातील मृत्यूदर कमी करण्यासाठी गाव तिथे कोविड सेंटर सुरू करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सोमवारी शंभर गावांमधील सरपंचांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यात डॉक्टर असलेल्या दोन सरपंचांनी आपल्या गावात कोविड सेंटर सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली.

ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढला आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने शहराकडे रुग्ण येत आहेत. शहरात बेड मिळत नसल्याने अनेकांची ससेहोलपट होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्येच २५ बेडचे कोविड उपचार केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रांच्या तयारीसाठी त्यांनी सोमवारी सरपंच, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्याशी संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी प्रत्येकाला कामाची जबाबदारी वाटून दिली. कोविड सेंटरसाठी गावातील मोठ्या हॉलची निवड करून तेथे शौचालय, सांडपाणी, पिण्याचे पाणी व दिवाबत्तीची सोय करावी, अशा सूचना दिल्या.

...तर हॉस्पिटलला पाठवणार

कोरोनाची लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना याठिकाणी दाखल करायचे आहे. या कोविड सेंटरमुळे रुग्णांची आपल्या गावातच सोय होईल. घरचे जेवण देता येईल. रुग्णही नातेवाईक व डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहतील. यामुळे जाण्या - येण्याचा खर्च वाचेल. तसेच लक्षणे गंभीर झाल्यास लगेच पुढे हॉस्पिटलला रेफर करता येईल. कोविड सेंटरसाठी जिल्हा परिषदेतर्फे औषधे पुरवली जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी सांगितले.

डॉक्टरांनी दाखवला पुढाकार

यावेळी मोहोळ तालुक्यातील आष्टी गावचे सरपंच डॉ. व्यवहारे यांनी गावच्या कोविड सेंटरची जबाबदारी उचलण्याची तयारी दर्शवली. मला औषधे द्यावी, गावातील लोकांची मी सेवा करेन, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी जिल्हा परिषदेतर्फे औषधांचा पुरवठा केला जाईल, असे सांगितले. यावेळी स्वच्छता विभागाचे जिल्हा कार्यक्रम प्रमुख सचिन जाधव यांनी घनकचरा व्यवस्थापनाबाबत सर्व सरपंच व ग्रामसेवक यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत, चंचल पाटील, जावेद शेख, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. इरफान सय्यद उपस्थित होते.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या