शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी अर्ज भरताना सुशीलकुमार शिंदे चष्मा अन् जयसिद्धेश्वर महास्वामी विसरुन आले पासबुक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 15:17 IST

काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले.

ठळक मुद्देभाजपाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे दुपारी सव्वादोन वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले.काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले.

सोलापूर : काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले. त्यांच्यासोबत पाच जणांना प्रवेश असल्याने आमदार प्रणिती शिंदे यांना प्रवेशद्वारावरच थांबावे लागले. कार्यालयात पोहोचल्यावर शिंदे यांना चष्मा विसरल्याचे लक्षात आले. ही बाब निदर्शनाला आल्यावर त्यांनी चालकाशी संपर्क साधला. जिल्हाधिकारी कार्यालयात कुणीकडून यावे या गडबडीत पिशवी घेऊन चालक धावत आला. प्रवेशद्वारावर पिशवीतून चष्मा शोधून शिंदे यांना पोहोच करण्यात आला. 

भाजपाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे दुपारी सव्वादोन वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. अर्ज भरताना त्यांना बँकेचे पासबुक विसरल्याचे लक्षात आले. त्यांनी बुळ्ळा यांच्याशी संपर्क साधला. गाडीतून पासबुक घेऊन बुळ्ळा धावतच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आले. तेथून शिवाचार्य यांना पासबुक पोहोच करण्यात आला. प्रवेशद्वारावरील पोलीस प्रत्येक बाबीची कसून तपासणी करीत होते. 

जुन्या नोटा घेऊन आला उमेदवारमला उमेदवारी दाखल करायची आहे, असे सांगत अनिल उर्फ पप्पू पांढरे हा इसम आरडाओरडा करीत  आला. पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ पोलिसांनी त्याला अडविले. त्याने गोंधळ करण्यास सुरुवात केली. हातातील अर्ज व कॅरीबॅगमध्ये असलेल्या चलनातून बाद करण्यात आलेल्या जुन्या हजाराच्या नोटांची बंडले त्याने दाखविली. ही माझ्या वडिलांची कमाई आहे. मी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलो आहे, असे सांगताच पोलीस त्याला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत घेऊन आले. पण त्याच्याजवळील नोटा जुन्या असल्याचे लक्षात आल्यावर त्याला आल्या पावली पोलिसांनी परत पाठविले. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेElectionनिवडणूकPoliticsराजकारण