शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

सुरेश पाटील विषबाधा प्रकरण ; जबाबासाठी नगरसेवकांचे ठाण्यात हेलपाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 16:27 IST

सोलापूर : नगरसेवक सुरेश पाटील यांनी विषबाधाप्रकरणी ज्यांची ज्यांची नावे घेतली होती त्यांचा जबाब घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. ...

ठळक मुद्देसुरेश पाटील यांनी विषबाधाप्रकरणी ज्यांची ज्यांची नावे घेतली होती त्यांचा जबाब घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकांना पाणी पाजणारे शिपाईही यातून सुटले नाहीत. 

सोलापूर : नगरसेवक सुरेश पाटील यांनी विषबाधाप्रकरणी ज्यांची ज्यांची नावे घेतली होती त्यांचा जबाब घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. मंगळवारीे काही नगरसेवकांनीही यासाठी पोलीस ठाण्यात हेलपाटे मारले. महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकांना पाणी पाजणारे शिपाईही यातून सुटले नाहीत. 

थेलियम विषबाधा प्रकरणात सुरेश पाटील यांनी अनपेक्षित नावे घेतल्याने काँग्रेस, बसपा आणि राष्ट्रवादीतील मोर्चेकरी मित्रांचा भ्रमनिरास झाल्याची चर्चा महापालिकेत रंगली आहे. यातील एका मित्राने सुरेश पाटील यांच्या घरी जाऊन ‘काय अण्णा, करायला गेलो एक आणि तुम्ही दुसरंच करून ठेवलं’ असे बोलून दाखविले. तर दुसºयाने, मी आता अण्णाकडे जात नसतो, असे कळविल्याचेही मंगळवारी ऐकायला मिळाले. 

 विषबाधा प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी सुरेश पाटील मित्र परिवाराच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाच्या तयारीची बैठक सुरेश पाटलांच्या घरी व्हायची. मोर्चात कोणी काय बोलायचे, कोणावर जास्त टीका करायची नाही याचे मार्गदर्शन सुरेश पाटील करीत असल्याची चर्चा होती. ‘भाऊ आणि दादा’ त्यांना फोन लावून देण्याचे काम करायचे. पालकमंत्र्यांच्या विरोधात या सर्व घटना घडत असल्याचा भास यातून निर्माण होत होता. त्यामुळे पालकमंत्री गटही अस्वस्थ होता. 

अखेर सुरेश पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन सहकारमंत्री गटातील नेत्यांवर संशय व्यक्त केला. यानंतर मित्र गटात अस्वस्थता पसरली. सायंकाळी एका मित्राने पाटलांचे घर गाठले. अण्णा हेच करायचे होते तर आम्हाला का गुंतवले. नावं घेण्यापूर्वी आम्हाला तर सांगायचे होते. काल-परवा तर दुसरंच बोलता होता. अण्णा तुम्ही हे बरोबर केलं नाही, असे सुनावले. दुसºया मित्राने तर अण्णांच्या घराकडे फिरकण्यास नकार दिला. पालकमंत्री गटातील प्रमुख नगरसेवकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. पण अण्णांनी पोलिसांकडे हे प्रकरण सोपवायला हवे होते. उगीच इतरांची नावे घेतली, अशी प्रतिक्रिया नाव न सांगण्याच्या अटीवर नोंदविली. लक्ष्मीदर्शन कोणी घडविले ?

  • - काल-परवा ठराविक नेत्यांचे नाव येत होते. पण दिवाळीत लक्ष्मीदर्शन झाल्यामुळेच सुरेश पाटील यांनी ठराविक नेत्यांचे नाव वगळून इतर लोकांची नावे घेतल्याचा आरोप महापौर शोभा बनशेट्टी यांचे पती श्रीशैल बनशेट्टी यांनी केला आहे. या आरोपानंतर अण्णांना नेमकं कोणत्या नेत्याने लक्ष्मीदर्शन घडविले याची चर्चाही महापालिकेत रंगली आहे. दरम्यान   जबाबासाठी मुदत मिळावी, असे लेखी पत्र महापौर शोभा बनशेट्टी यांच्यातर्फे पोलिसांना देण्यात आले आहे.
  •  

सुरेश पाटील प्रकरणाचा चेंडू सरकारी वकिलांच्या कोर्टात- सध्या गाजत असलेल्या नगरसेवक सुरेश पाटील यांच्या विषप्रयोगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी जोडभावी पेठ पोलिसांनी जिल्हा सरकारी वकिलांकडे मंगळवारी अभिप्राय मागवला आहे. 

  • - नरसेवक सुरेश पाटील यांच्या विषप्रयोगप्रकरणी सध्या पोलिसांनी जाबजबाबाला सुरूवात केली आहे. सुरेश पाटील यांच्या तक्रारीवरून महानगरपालिकेतील शिपाई, लिपिकापासून अन्य कर्मचारी व संशयितांना जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात बोलावले जात आहे. प्रत्येकाचा जबाब घेतला जात आहे. जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीपसिंह राजपूत यांच्या अभिप्रायानंतर संशयितांवर गुन्हे दाखल होणार आहेत. 
टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाPoliticsराजकारणSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस