शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात सांगोला, पंढरपूरला मिळणार मुबलक पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:16 IST

पंढरपूर : पंढरपूर, सांगोला शहरांना पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यातील पाणीपातळी प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात खालावली जाते. यामुळे आंबाबाई मंदिरासमोरील ...

पंढरपूर : पंढरपूर, सांगोला शहरांना पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यातील पाणीपातळी प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात खालावली जाते. यामुळे आंबाबाई मंदिरासमोरील नदीपात्रात असणाऱ्या बंधाऱ्याची उंची व लांबी वाढवण्याबाबत नगरपरिषदेने आरखडा तयार केला आहे. यामुळे भविष्यात पंढरपूर, सांगोला शहरांतील नागरिकांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याला सामोरे जावे लागणार नाही.

उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी अंबाबाई मंदिरासमोरील नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात अडविण्यात येते. या बंधाऱ्याची उंची तीन मीटर आहे. या बंधाऱ्यातून पंढरपूर, सांगोला शहर व ८१ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.

प्रत्येक वर्षी ऐन उन्हाळ्यात बंधाऱ्यातील पाणीपातळी खालवली जाते. यामुळे नगरपरिषदेला शहरात एक व दोन दिवसआड पाणीपुरवठा करावा लागतो. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते.

भीमा नदीला पूर आल्यानंतर बंधाऱ्याचा भराव वाहून गेला होता. यामुळे पंढरपूर नगरपरिषदेने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. बंधाऱ्याची उंची एक मीटर व लांबी १५० मीटरनी वाढवण्याचा विषय नगरपरिषदेचे सर्वसाधारण सभेत मंजूर केला होता. त्यासाठीचा तीन कोटींचा आराखडा तयार झाला असून तो जनरल सभेमध्ये मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व पाणीपुरवठा अभियंता आत्माराम जाधव यांनी सांगितले

-----

बंधाऱ्याची सद्य:स्थिती

- लांबी ३३० मीटर

- उंची ३ मीटर

- पाणी साठवण क्षमता १०६ द. श. ल. घनफूट

- एवढे दिवस पाणी पुरते ४५

- बंधाऱ्यात असा होणार बदल

- बंधाऱ्याची लांबी ११० मीटरनी वाढणार

- बंधाऱ्याची उंची १ मीटरनी वाढणार

- पाणी साठवण क्षमता ७० दशलक्ष घनफूट वाढणार

- अधिक २५ दिवस पाणीपुरवठा होईल.

.......................