शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘म्होरक्या’च्या निर्मात्याची सावकारीला कंटाळून आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 12:13 IST

कर्करोगाचा त्रास आणि चित्रपट निर्मितीसाठी घेतलेले खासगी कर्ज अशा दुहेरी संकटात सापडल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले

ठळक मुद्देपत्नीची फिर्याद; दोघांविरुद्ध अशोक चौक पोलीस चौकीत गुन्हा’आरोपीने जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती.

सोलापूर : राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘म्होरक्या’ या मराठी चित्रपटाचे निर्माते कल्याण राममोगली पडाल (३८) यांनी गुरूवारी  घरात टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र ही बाब रविवारी मध्यरात्री उघडकीस आली़ कर्करोगाचा त्रास आणि चित्रपट निर्मितीसाठी घेतलेले खासगी कर्ज अशा दुहेरी संकटात सापडल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

खासगी कर्जामुळे सावकारांकडून तगादा लावण्यात येत असल्याचे, आत्महत्येपूर्वी कल्याण यांनी पोलीस आयुक्त आणि गृहमंत्रालयाला दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले होते. या अर्जाची प्रत आता स्थानिक पोलिसांना देण्यात आल्याचे पडाल कुटुंबीयांनी सांगितले. कल्याण यांचे ज्येष्ठ प्रा़ व्यंकटेश पडाल यांनी ‘बांधकाम व्यवसायातून जमवलेले काही पैसे कल्याणने ‘म्होरक्या’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी गुंतवले़ दुर्दैवाने कल्याणला यकृताचा कर्करोग झाल्याचेही  निष्पन्न झाले़ या धक्क्याने वडिलांचे महिन्यांपूर्वीच निधन झाले़ कर्करोग उपचारांसाठी कल्याणने खासगी सावकाराकडून काही पैसे घेतले होते़ त्यामुळे सावकारांचा तगादा सुरू होता़

पत्नीची फिर्याद; दोघांविरुद्ध गुन्हा’- मयत कल्याण यांना जानेवारी २०१८  पोटदुखीचा त्रास वाढल्याने त्यांना सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर हैदराबाद व पुणे येथे उपचार घेण्यात आले. त्यावेळी मयत कल्याण यांना कॅन्सर आणि काविळ झाल्याचे समजले होते.मयत कल्याण यांनी उपचारासाठी आरोपी श्रीनिवास संगा व संतोष बसुदे या दोघांकडून एक लाख रुपये उसने घेतले होते. त्याच्या बदल्यात ते ९ लाख रुपये मयत कल्याणला मागितले होते. या त्रासाला कंटाळून कल्याणने आत्महत्या केल्याची फिर्याद रेणुका यांनी रविवारी रात्री अशोक चौक पोलीस चौकीत दिली.

जिवे ठार मारण्याची धमकी दिली- आरोपीने मयत कल्याण यांना त्यांच्या घरामध्ये घुसून बायका आणि मुलांना उचलून नेण्याची धमकी देऊन वेळ पडली तर ठार मारण्याची धमकी दिली होती.

टॅग्स :SolapurसोलापूरFilmfare Awardफिल्मफेअर अवॉर्डmarathiमराठी