शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

सशक्त मन हीच आनंदाची गुरूकिल्ली : राजा माने,  स्व. अरविंदभाई जव्हेरी व्याख्यानमालेत दिला ‘कसं जगण्याचा’ कानमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 14:25 IST

‘जगायचं कसं’ ही तुमची-आमची समस्या नसून जगाची अस्वस्थता आहे. जग हे तणावाकडे चालले असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी मन सशक्त ठेवून आपले काम आणि जबाबदारी निष्ठेने पार पाडली तरच आपल्याला जगण्याचा मार्ग सापडतो,

ठळक मुद्दे२२२ देशात तणावाची परिस्थिती असून, भारत १२१ व्या स्थानी जगात घडणाºया घडामोडींचा आपल्या मनावर निश्चित परिणाम होत असतो जगातील घडामोडींकडे सकारात्मक नजरेने पाहिले तर आपल्याला जगण्याचा मार्ग निश्चितच सापडेल

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ११ : ‘जगायचं कसं’ ही तुमची-आमची समस्या नसून जगाची अस्वस्थता आहे. जग हे तणावाकडे चालले असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी मन सशक्त ठेवून आपले काम आणि जबाबदारी निष्ठेने पार पाडली तरच आपल्याला जगण्याचा मार्ग सापडतो, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे संपादक राजा माने यांनी रविवारी केले. गुजराती मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या स्व. अरविंदभाई जव्हेरी व्याख्यानमालेत ‘सांगा जगायचं कसं‘ या विषयावर ते बोलत होते. यावेळी मंचावर मंडळाचे अध्यक्ष विजयभाई पटेल, मणिकांत दंड, संदीप जव्हेरी उपस्थित होते. माने पुढे म्हणाले, जगातील घडामोडी पाहता जग हे तणावग्रस्त झाल्याचे दिसते. जागतिक ह्युमन हॅपीनेसच्या अहवालानुसार २२२ देशात तणावाची परिस्थिती असून, भारत १२१ व्या स्थानी आहे. जगात घडणाºया घडामोडींचा आपल्या मनावर निश्चित परिणाम होत असतो. आणि आपले मन अस्वस्थ होते. देशात जी स्थित्यंतरे अथवा राजकीय उलथापालथ झाल्या त्यालाही भारतीयांची मानसिकताच कारणीभूत आहे. सध्याची मोदी लाट ही सुध्दा ताजे उदाहरण म्हणता येईल. देशात गेल्या काही दिवसात घडलेल्या हत्या, आर्थिक निर्णय, आंतरराष्टÑीय घडामोडी, नोटाबंदी, जीएसटी याबरोबरच आपल्या गावात घडणाºया छोट्या-मोठ्या घटना यासारख्या गोष्टींनी निश्चितच आपले मन विचलित झाले असल्याचे सांगून आपण काय काम करतो आणि आपली जबाबदारी काय आहे यांची सांगड घालून आपली कृती करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. आपण कुटुंबप्रमुख, आई, वडील, पती, पत्नी कोणत्याही भूमिकेत असाल तरी ती भूमिका जबाबदारीने आणि निष्ठेने पार पाडतो का? यावर विचारमंथन करुन ती पार पाडल्याशिवाय आपल्याला आनंद सापडणार नाही. आपण एखाद्या घटनेकडे किती सकारात्मक व नकारात्मक दृष्टीने पाहतो त्याच्या दुपटीने आपणाला तसाच प्रतिसाद मिळतो. यासाठी आपण जगातील घडामोडींकडे सकारात्मक नजरेने पाहिले तर आपल्याला जगण्याचा मार्ग निश्चितच सापडेल, असे राजा माने म्हणाले. प्रारंभी मणिकांत दंड यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. जे. जे. कुलकर्णी यांनी परिचय करून दिला; तर संदीप जव्हेरी यांनी आभार मानले. यावेळी गुजराती मित्रमंडळाचे उपाध्यक्ष मुकेश मेहता, खजिनदार चिमणभाई पटेल, विश्वस्त प्रवीणभाई वोरा, मनुभाई सोनछत्रा, कांताभाई पटेल, जयेश पटेल, संजय शाह, भरत ब्रह्मभट्ट, इंदिरा पटेल, हसुमती जव्हेरी, युवा फोरमचे अध्यक्ष, सदस्य तसेच किशोर चंडक, राजशेखर येळीकर, राज मिणियार, राजगोपाल झंवर, प्रा. राजशेखर येळीकर, गुरूराज येल्लटी, नरेंद्र पुजारी, जगदीश रांभिया, दीपक पाटील, केतनभाई शहा, रविकिरण पोरे,अनिल विपत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नल्लामंदू, रवींद्र जोगीपेठकर आदी उपस्थित होते.---------------संघवी यांच्या विनोदी किस्स्यांना दादविख्यात गुजराती साहित्यिक चंद्रकांत संघवी यांच्या विनोदी किस्स्यांनी आज श्रोत्यांना मनमुराद हसविले. समाजात वावरताना त्यांनी केलेल्या निरीक्षणाच्या आधारावर असलेल्या या किस्स्यांना दाद मिळाली. स्व. अरविंदभाई जव्हेरी व्याख्यानमालेत सकाळी संघवी यांचे ‘हसता हसता क्यारेक’ या विषयावर गुजरातीमधून व्याख्यान झाले. यावेळी संघवी यांच्या ‘आडी सोय’, ‘चला मुरारी हिरो बनने’ या दोन गुजराती साहित्यकृतींचे प्रकाशन झाले.