शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आज रात्रीपासून सोलापुरात कडक संचारबंदी; विनाकारण फिरणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 14:35 IST

चौकाचौकात असणार पोलिसांचा बंदोबस्त; अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही असणार बंद

सोलापूर - शुक्रवारच्या रात्री आठ पासून शनिवार आणि रविवार या दोन दिवसा करता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या दोन दिवसात शहर परिसरातील अत्यावश्यक सेवेत मोडणारे सर्व दुकाने चालू राहतील मात्र सर्वसामान्य व्यक्तींना शहरात फिरता येणार नाही.  विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर संचारबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद केले जातील.

आज रात्री 8 :00 पासून पूर्ण शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून लोकांनी कारण असल्याशिवाय बाहेर पडू नये शहरात पोलीस चेकिंग होणार असून त्यांच्या चेकिंग च्या वेळेस योग्य तो कारण असेल तरच आपल्याला सोडले जाईल तसे नसेल तर त्यांच्यावर ती कारवाई करण्यात येईल सोमवारी सकाळी सात पर्यंत संचार बंदी असल्याने नागरिकांनी घरीच सुरक्षित रहा. शनिवार व रविवारी  संचारबंदी मध्ये सोलापूर शहर परिसरात अत्यावश्यक सेवेमध्ये मुभा देण्यात आलेल्या दुकानदार, रिक्षा चालक, डिलेवरी बॉय, कारखानदार येथील काम करणाऱ्या व्यक्तींना करोनाची चाचणी बंधनकारक करण्यात आलेली आहे.

दरम्यान, संबंधित अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या मालक आणि कर्मचाऱ्यांनी आपली करोना चाचणी करून घेतल्याचे प्रमाणपत्र आपल्या दुकानात लावणे बंधनकारक असणार आहे. निगेटिव्ह प्रमाणपत्र  नसेल तर त्यांच्यावर शासनाच्या आदेशाप्रमाणे कारवाई करण्यात येईल अशी माहिती महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांनी दिली. आज रात्री आठपासून सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी करण्यात आली असून त्यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील बाकी सर्व बंद असणार आहे तसेच नागरिकांनी कारण असेल तरच बाहेर पडा कारण नसेल तर घरी थांबा विनाकारण बाहेर पडू नका असे आवाहन आयुक्त पि.शिवशंकर यांनी केले.

 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस