शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त जिल्ह्यांना १३५६ कोटींची मदत; राज्य सरकारचा शासन निर्णय
2
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
3
“PM मोदी अन् नितीश कुमारांची जादू, बिहारमध्ये NDAचाच विजय होणार”; CM फडणवीसांना विश्वास
4
जरांगे चक्क CM फडणवीसांच्या बाजूने बोलले; म्हणाले, “काही लोक अडचणीत आणतात, पण आमचा विश्वास”
5
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी ट्रॅव्हिस हेडचं मोठं वक्तव्य, रोहित-विराटबद्दल म्हणाला...
6
'थामा'मध्ये रश्मिका मंदानाचे दमदार अ‍ॅक्शन सीन्स; म्हणाली, "पहिल्यांदाच मी अशा..."
7
टायटन-रिलायन्ससह 'या' स्टॉक्सचा धमाका! निफ्टीने १२ महिन्यांचा विक्रम मोडला, एका दिवसात २% तेजी
8
दिवाळीत आपलं कुटुंब ठेवा सुरक्षित! फक्त ५ रुपयांत ५०,००० चा विमा; या कंपनीने आणला 'फटाका इन्शुरन्स'
9
‘तुम्ही चुकीचे आहात, पंतप्रधान मोदी ट्रम्प यांना घाबरत नाहीत...’; अमेरिकन सिंगरने राहुल गांधींना फटकारले
10
Kolhapur Crime: धक्कादायक! कोल्हापूरमध्ये सहा नृत्यांगनांनी केला सामूहिकरीत्या जीवन संपवण्याचा प्रयत्न
11
"त्या त्या वेळी तुम्ही आडवे झाले आहात"; शिंदेंच्या नेत्याने थोपटले दंड, भाजपच्या आमदारानेही दाखवले 'बळ'
12
पोस्टाने आता २४ तासांत गॅरंटीड डिलिव्हरी सेवा! टपाल विभागाचे प्रायव्हेट कुरिअर कंपन्यांना आव्हान
13
“शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईपर्यंत सरकारला सोडायचे नाही, आधी १ लाख द्या”; उद्धव ठाकरेंची टीका
14
PM मोदींच्या आईबद्दल अपशब्द भोवले, काँग्रेसच्या मोहम्मद नौशादांची उमेदवारी रद्द...
15
युवा चेहरा, हिरा व्यापारी...कोण आहे हर्ष सांघवी?; सर्वात कमी वयात भाजपानं दिली मोठी जबाबदारी
16
Ranji Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळलं, पठ्ठ्यानं रणजी स्पर्धेत काढला राग, ठोकलं द्विशतक!
17
अफगाण सीमेवर आत्मघातकी हल्ल्यात सात पाकिस्तानी सैनिक ठार, दोन्ही देशांमध्ये तणाव कायम
18
काही मिनिटांत झोमॅटोच्या दीपिंदर गोयल यांचे बुडाले ५५६ कोटी रुपये; छोट्या गुंतवणूकदारांनीही हात वर केले, कारण काय?
19
भारतीय हवाई दलाची ताकद वाढली, शत्रूचे धाबे दणाणणार; स्वदेशी तेजस MK1 A लढाऊ विमानाचं उड्डाण
20
“सढळहस्ते मदत करायची सरकारची तयारी नाही, शेतकऱ्यांची दिवाळी काळी...”; शरद पवारांची टीका

पंढरपुरात कडक संचारबंदी; जागोजागी ग्रामीण पोलिसांचा आहे बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 17:30 IST

पंढरपूर शहरातील रस्ते सामसूम; सात दिवसाच्या संचारबंदीत अत्यावश्यक सेवा सुरू

ठळक मुद्देकोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात रॅपिड अ‍ॅटीजेन टेस्टची मोहीम सुरु प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावेतालुक्यात आज एका दिवसात विविध गावांमध्ये ५०० रॅपिड अ‍ॅटिजेन टेस्ट

पंढरपूर : पंढरपूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी सात दिवस संचारबंदीचे आदेश पारीत केले आहेत. शहरात  पहिल्याच दिवसांपासून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरु असून जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची  माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी दिली.

पंढरपुरातील नागरिकांनीही घरातच थांबून संचारबंदीच्या आजच्या पहिल्या व दुसºया दिवशी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. पंढरपूर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून, संचारबंदीची कडक अंमलबजावणीसाठी शहरात १३७ पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच २५० कोरोना वॉरियर्सचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहरात सात दिवसांच्या संचारबंदी कालावधीत दूध, हॉस्पिटल व मेडीकल या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. कोणीही विनाकारण फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन व साथरोग प्रतिबंध कायद्यांतर्गत कडक कारवाई  करण्यात येईल, असेही डॉ. कवडे यांनी सांगितले.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात रॅपिड अ‍ॅटीजेन टेस्टची मोहीम सुरु असून नागरिकांनी आरोग्य तपासणी करुन घ्यावी. तसेच प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही  त्यांनी केले आहे.  तालुक्यातील टाकळी येथे काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली. टाकळी हा परिसर पंढरपूर शहराला लागून असल्यामुळे येथेही मोठ्या प्रमाणात रॅपिड अ‍ॅटिजेन टेस्टची सुरुवात केली आहे. तालुक्यात आज एका दिवसात विविध गावांमध्ये ५०० रॅपिड अ‍ॅटिजेन टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी दिली.

रॅपिड अ‍ॅटिजेन टेस्टमुळे रुग्ण संख्येत काहीशी वाढ होताना दिसत असली तरी नागरिकांनी चिंतीत न होता रुग्ण सापडणे हे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी फायदेशीर आहे. हे लक्षात घेवून रुग्ण शोध मोहीम प्रभावीपणे राबविण्यावर आणि कोरोनाची साखळी तोडण्यास अधिकाधिक भर देण्यात येणार असल्याचे घोडके यांनी  सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरcorona virusकोरोना वायरस बातम्या