अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष ॲड. असिफ तांबोळी होते. यावेळी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी सुनील बनसोडे, अजित कुंकूलोळ, दत्तगुरू संस्थेच्या अध्यक्षा चंद्रकला बोरगावकर उपस्थित होते.
प्रास्ताविक संयोजक श्रीधर कांबळे यांनी केले तर आभार संगीता वाघुले यांनी मानले. सूत्रसंचालन शिल्पा मठपती यांनी केले. कार्यक्रमासाठी स्वप्नील तुपे, प्रसाद दाभाडे, सिद्धार्थ नांदेडकर, नागेश मनगिरे यांनी परिश्रम घेतले.
हभप रंगनाथ काकडे म्हणाले, महिलांचे सबलीकरण व सक्षमीकरण करणे हीच आपली खरी भारतीय संस्कृती आहे. त्यामुळे तिचे संवर्धन करण्याचा संकल्प जबाबदार नागरिक म्हणून या महिला दिनानिमित्त करु. हीच श्रेष्ठ मातृभक्ती ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्त्री रत्न पुरस्काराचे मानकरी
प्रीती इरेगौडा-अय्यंगार (उद्योजिका), शिल्पा मठपती(लेखन), ज्योती सापनाईकर (उद्योजिका), ॲड. सुप्रिया गुंड-पाटील (विधी), ॲड. वर्षा साखरे (विधी), मीरा विश्वनाथ कित्ती (बँकिंग क्षेत्र),
छाया कुलकर्णी (लेखन/शैक्षणिक कार्य),
जयमाला गरड (सामाजिक), स्वाती काटे-भालेराव (पोलीस), यशोदा भिसे (पोलीस),
संगीता जाधव (होमगार्ड), शोभा वासकर (होमगार्ड), अर्चना थिटे (वैद्यकीय), वंदना यादव (वैद्यकीय),
शुभांगी नेवाळे(तंत्रशिक्षण/रोजगार निर्मिती), रुपाली तावडे (बस प्रवासी), सुशीला कांबळे (फिटनेस कोच), आशा भाळशंकर(कॅन्टीन),
अनुसया आगलावे (अंगणवाडी सेविका), अनिता बोधले (अंगणवाडी सेविका), साक्षी गायकवाड व स्वप्नाली अवघडे (अभिनय/नृत्य),
अमृता कुंकूलोळ (रक्तदान चळवळ), उज्ज्वला पलसे (बचतगट), रुपाली जाधव (शासकीय योजना), मीना कडवे (घरगुती उद्योग), वंदना गादेकर (तंत्रशिक्षण कार्य).
फोटो
०८बार्शी-महिला दिन
ओळी
बार्शी येथील दत्तगुरू संस्थेतर्फे स्री रत्न पुरस्कार गौरव सोहळ्यात महिलांना सन्मानित केले. याप्रसंगी श्रीधर कांबळे, हभप रंगनाथ काकडे, नगराध्यक्ष ॲड. असिफ तांबोळी, सुनील गायकवाड, चंद्रकला बोरगावकर आदी.