शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

सांगोला, पंढरपूर तालुुक्यात वादळाचा कहर

By admin | Updated: June 3, 2014 01:13 IST

पुन्हा रौद्ररुप: खडसोळीत वीज पडून बालिका ठार; किडबिसरीत महिलेचा मृत्यू

पंढरपूर/ंसांगोला : जिल्ह्यातील पंढरपूर आणि सांगोला तालुक्यात आज (सोमवारी) पुन्हा वादळी वार्‍यासह पाऊस झाल्याने सर्व त्र हाहाकार उडाला. पंढरपूर तालुक्यातील खडसोळीत वीज अंगावर पडल्याने हेमा उत्तम जगताप (वय- ११) या बालिकेचा तर सांगोला तालुक्यातील किडबिसरीत घरावरील पत्रे उडाल्याने लोखंडी अँगल अंगावर पडल्याने रत्नाबाई श्यामराव देवकते या महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. याशिवाय दोन्ही तालुक्यात तीन जनावरे दगावली तर चारजण जखमी झाले. अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पंढरपूर तालुक्यात २६ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या वादळी वार्‍यासह पावसाचा कहर अद्यापपर्यंत कायम असल्याने शेतकर्‍यांसह सगळेच भयभीत झाले आहेत. पंढरपूर—सांगोला रस्त्यावरील एका नारळाच्या झाडावर सोमवारी सायंकाळच्या सुमारास वीज कोसळली. यामध्ये कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही. सुस्ते येथे एका म्हशीवर वीज कोसळल्याने ती जागीच ठार झाली तर खडसोळीतही वीज अंगावर पडल्याने हेमा उत्तम जगताप (वय ११) या बालिकेचा बळी गेला. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुस्ते, तारापूर, मगरवाडी या भागात गारपिटीने कहर केला होता. वादळीवार्‍याने घरांवरील पत्रे उडून गेल्याने कित्येकांचे संसार उघड्यावर पडले होते. दरम्यान पुन्हा दुसर्‍यांदा अवकाळीचा तडाखा बसल्याने पटवर्धन कुरोली, शेळवे, खेडभोसे, देवळे, गुरसाळे या भागात शेतीबरोबर मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली होती. पुळूजमध्ये पत्र्यांच्या दांडक्याला अडकविलेला पाळणा उडून गेल्याने एक चिमुरडी जखमी झाली होती तर गुरसाळेत एका मुलाचा मृत्यू झाला होता. खरसोळी (ता. पंढरपूर) येथील हेमा उत्तम जगताप (वय ११) ही भर दुपारी आईला जेवणाचा डबा घेऊ जात असताना सुटलेल्या वादळ वार्‍यात पडलेल्या वीजेने भाजून जखमी झाली. तिला उपचारासाठी पंढरपुरात आणत असताना तिचा मृत्यू झाला. ही घटना दुपारी खरसोळी हद्दीत घडली. सांगोला तालुक्यातील घेरडी परिसरास सोमवारी सायंकाळच्या सुमारास गारपिटीच्या पावसाने फटका बसला.

---------------------------

अँगल डोक्यात पडल्याने महिलेचा मृत्यू

किडबिसरी, देवकाते वस्ती येथील शामराव देवकाते यांच्या घरावरील पत्रे उडून झालेल्या दुर्घटनेत लोखंडी अँगल डोक्यात पडल्याने रत्नाबाई श्यामराव देवकते या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर मिरज येथील रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. शारदा यशवंत घेरडे व प्रकाश भीमराव कोळेकर यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या भागात वादळी वार्‍यामुळे अनेक वृक्ष उन्मळून पडले असून विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याचे शिवाजी घेरडे यांनी सांगितले. सुस्तेत वीज पडून म्हैस दगावली सोमवारी दिवसभर उकाड्याने त्रस्त झालेल्या जनतेला सायंकाळच्या गारव्याने दिलासा दिला. मात्र पुन्हा कहर करीत मगरवाडी परिसरात तासभर गारपीट झाल्याने पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा एकदा शेतकरी हबकून गेला आहे. वादळीवार्‍यामुळे झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी तारा तुटल्याने वीज गायब झाली . सुस्ते (ता. पंढरपूर) येथील बाबासाहेब अप्पाराव करपे यांच्या म्हैसवर वीज कोसळल्याने ती जागीच ठार झाली. तालुक्यात सर्वदूर वादळाचा जोर होता.