शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुजाºयांनी परवानगी देताच सुरू झाली तुफान दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:11 IST

भोयरेत धुलीवंदनाची अनोखी परंपरा : जगदंबा देवीचा खेळ पाहण्यासाठी हजारो भाविकांची उपस्थिती

ठळक मुद्देभाविक गावाच्या वेशीवर येऊन दोन गटात विभागून दगड फेकले़ नंतर ते दोन्हीही गट जगदंबा मंदिराच्या दिशेने मार्गस्थ एक गट मंदिराच्या गाभाºयावर तर दुसरा गट मंदिराच्या पायथ्याशी उभा राहिलापुजारी मंदिरात पोहोचून खेळास परवानगी देताच दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक सुरू

नरखेड : भोयरे (ता. मोहोळ) येथे  श्री जगदंबा देवीच्या पुजाºयांनी परवानगी देताच सुरू झाली तुफान दगडफेक अन् पुन्हा बंदचा इशारा देताच दोन्ही गटातून दगडफेक बंद झाली़ जगदंबा देवी मंदिरासमोर हा दगडफेकीचा खेळ पार पडला. हा खेळ पाहण्यासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती.

धुलीवंदन दिवशी भोयरे येथे भाविक श्री जगदंबा देवी मंदिरातून दर्शन घेऊन पुजाºयासह भोगावती नदीच्या दिशेने गेले़ त्यानंतर नदीमध्ये लहान मुलांच्या कुस्त्या पार पडल्या़ सर्व भाविक गावाच्या वेशीवर येऊन दोन गटात विभागून दगड फेकले, नंतर ते दोन्हीही गट जगदंबा मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झाले़ एक गट मंदिराच्या गाभाºयावर तर दुसरा गट मंदिराच्या पायथ्याशी उभा               राहिला. 

पुजारी मंदिरात पोहोचून खेळास परवानगी देताच दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक सुरू झाली. या दोन्ही गटामधील अंतर केवळ १५० ते २०० फूट आहे़ साधारणत: हा खेळ २० मिनिटे चालू राहिला. अखेर पुजाºयांनी खेळ बंदचा इशारा करताच दोन्हीही गट दगड फेकण्याचे थांबविले़ नंतर सर्वच भाविकांनी मंदिरात दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केल्याचे दिसून आले.

या दगडफेकीच्या खेळामध्ये काही भाविक जखमी झाले़ पण ते कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी गेले नाहीत तर मंदिरात जाऊन त्या जखमेवर देवीचा अंगारा लावला की जखम बरी होते, असे अनेक भाविकांनी सांगितले.

मनात द्वेष, रोष न ठेवता दगडफेक - भोयरेतील दगडफेकीच्या या खेळामध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही नियम व अटी नाहीत. याचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागी होणारे दोन्हीही गट कोणतेही राजकीय गटाचे नसतात. सहभागी भाविक मनात कोणताही राग, द्वेष, शत्रुत्व न ठेवता दगडफेक करतात़ याचे महत्त्व म्हणजे पायथ्याच्या गटाचा दगड केवळ धुलीवंदन दिवशी वर दुसºया गटापर्यंत जातात़ अन्यवेळी जात नाहीत, अशी आख्यायिका असल्याचे भोयरे ग्रामस्थ सांगतात़ यासाठी सूरज साठे, भैय्या पवार, उमेश ताकमोगे, नागेश थोरबोले यांनी परिश्रम घेतले़ 

टॅग्स :Solapurसोलापूरmohol-acमोहोळ